पुण्यात डोकं वर काढणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुण्याच्या (Pune News) आजूबाजूच्या भागातही या सिंड्रोमची रुग्णसंख्या दिसून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 59 वर पोहोचली असून त्यातील 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात सर्वाधिक 56 रुग्ण पुण्यातून आहेत. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात रुग्णसंख्या जास्त असल्याने आरोग्य विभागाने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. याचबरोबर त्या परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून तपासले जाणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की वाचा - Guillain-Barre syndrome : 'सकाळी उठल्यावर लक्षात आलं...' GBS ची लागण झालेल्या रुग्णानं सांगितला अनुभव
न्यूरोलॉजिकल सोसायटीतर्फे 'जीबीएस'वर मार्गदर्शिका जारी
स्वाईन फ्ल्यू, कोरोना पाठोपाठ गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा पुण्यात शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेतर्फे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दूषित अन्न किंवा पाणी पिल्याने 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' संसर्ग होऊ शकतो. याने अतिसार आणि ओटीपोटात दुखणे. काही व्यक्तींमध्ये, बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.डेंग्यू, चिकुनगुनिया, बॅक्टेरियासह इतर विषाणूंसारखे संक्रमण आहेत. ज्यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार होण्याची शक्यता न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेने वर्तवली आहे.
हा दुर्मीळ आजार उपचार करण्यायोग्य स्थितीत असल्याचे तज्ज्ञांनी जनतेला आश्वस्त केले असून घाबरू नये, असेही सांगितले आहे. त्याचप्रमाणे कोणालाही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याचे आवाहन न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अतिसार आणि ओटीपोटात दुखण्याचा होतोय त्रास; तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम
नक्की वाचा - Paragliding Death : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू, पायलटही दगावला!
जीबीएस म्हणजे काय?
जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे, सुन्न होणे, गंभीर प्रकरणांमध्ये चालायला त्रास होणे, अशी लक्षणे दिसतात.
प्रमुख लक्षणे कोणती?
पाय किंवा हातांमध्ये अचानक अशक्तपणा येणे.
चालण्यात अडचण किंवा बधिरपणा.
सतत अतिसार, विशेषतः रक्तरंजित असल्यास.
काय आहेत सूचना?
पिण्यापूर्वी पाणी उकळून घ्या.
पाण्याच्या सुरक्षिततेबाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरा.
भाज्या, फळे चांगले धुवा.
पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवा
कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी, सीफूड टाळा.
जेवण्यापूर्वी व शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुवा.
बाहेरील अस्वच्छ बाबी हाताळताना काळजी घ्या.