जाहिरात

GBS : मोठी बातमी! पुण्यातील 8 पाणीपुरवठा स्रोत प्रदूषित; गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महत्त्वाची अपडेट

जीबीएसला रोखण्यासाठी राज्य विभागाकडून नियमावली लागू केली आहे. काय आहेत जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना?

GBS : मोठी बातमी! पुण्यातील 8 पाणीपुरवठा स्रोत प्रदूषित; गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महत्त्वाची अपडेट

पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल 28 जानेवारीला कोल्हापूरात गुईलेनचा एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे राज्यभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अत्यंत महत्त्वाची (Pune GBS) बातमी समोर आली आहे. पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमची कारणं शोधण्यात मोठी प्रगती पाहायला मिळत आहे. राज्य प्रयोगशाळेने आठ पाणीपुरवठा स्रोतांमध्ये प्रदूषण शोधून काढलं आहे. त्यामुळे लवकर या आजारावर नियंत्रण आणणं शक्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या आजारामागील कारण शोधण्यासाठी राज्य प्रयोगशाळेने महत्त्वपूर्ण माहिती शोधली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आठ पाणीपुरवठा स्रोतांमध्ये प्रदूषण आढळून आले आहे. गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या प्रादुर्भावाचं कारण पाण्यातील प्रदूषण असण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी या दिशेने अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप GBS मुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Pune GBS : पुण्यातील 'त्या' विहिरीमुळे पसरला गुईलेन बॅरे सिंड्रोम, आरोग्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती 

नक्की वाचा - Pune GBS : पुण्यातील 'त्या' विहिरीमुळे पसरला गुईलेन बॅरे सिंड्रोम, आरोग्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती 

जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :
* अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी 
* जास्त दिवसांचा डायरिया 

अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :
* पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
* ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com