जाहिरात

Heat wave: जगात सर्वात उष्ण शहरांच्या यादीत अकोला दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण? यादी आली समोर

पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची ही लाट कायम राहाणार आहे. त्यामुळे गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

Heat wave: जगात सर्वात उष्ण शहरांच्या यादीत अकोला दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण? यादी आली समोर
  • अकोल्यात तापमान 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे ते जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे
  • एल डोरॅडो संकेतस्थळानुसार पाकिस्तानच्या नवाबशहा शहरात सर्वाधिक तापमान जवळपास 47 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे
  • महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नागपूर सोनगाव, नंदूरबार आणि चंद्रपूरसह पाच शहरं उष्णतेच्या यादीत आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अकोला:

योगेश शिरसाट 

Akola Heat wave News: सध्या राज्यात उष्णतेने सर्वच जण हैराण आहे. तापमान दिवसें दिवस वाढत चालले आहे. त्यात अकोल्यात तर उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे. अकोल्यात  तापमान 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे उष्ण शहरांच्या यादीत अकोला शहराचा जगात दुसरा क्रमांक लागल्याची नोंद झाली आहे. एल डोरॅडो या संकेत स्थळाने जगातील उष्ण शहरांची यादी जाहीर केली आहे. या  यादीत अकोला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उष्ण शहरांच्या या यादीत पाच शहरं ही महाराष्ट्रातील असल्याचं ही समोर आलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

एल डोरॅडो या संकेत स्थळाने जाहीर केलेल्या यादीत गेल्या चोविस तासाच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या नुसार जगात सर्वाधिक तापमान हे  पाकिस्तानच्या नवाबशहा या शहराचे आहे. इथले तापमान जवळपास 47 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर अकोला दुसऱ्या स्थानावर असून अकोल्याचे तापमान हे 46.9 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. यासोबत महाराष्ट्रातील काही शहरांचा ही समावेश आहे. त्यात वर्धा 46.4, यवतमाळ 46.4°C, नागपूर सोनगाव 45.4°C, नंदूरबार 45.2°C आणि 45°C या शहरांचा तपमान आहे. 

नक्की वाचा - Pratap Sarnaik: मराठी सक्तीबाबत काय निर्णय झाला? रिक्षा- टॅक्सी चालकांचं टेन्शन वाढलं की कमी झालं?

उष्णतेचा बाबती पहिल्या दहा शहरांमध्ये सर्वाधिक शहरं ही भारतातील आहेत. त्यात महाराष्ट्रातील ही पाच शहरं आहे. अकोला दुसऱ्या क्रमांकावर आहे तर वर्धा सहाव्या क्रमांकावर यवतमाळ आठव्या क्रमांकावर आहे. यवतमाळ नंतर सोनगाव दहाव्या क्रमांकावर आहे. नंदूरबार 14 तर चंद्रपूर 15 व्या क्रमांकावर आहे. दिवसेगणीत इथंलं वातावरण हे वाढतच चालल्याचं चित्र आहे. लोकांना घरा बाहेर पडणं ही मुश्किल झालं आहे. पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची ही लाट कायम राहाणार आहे. त्यामुळे गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.  

नक्की वाचा - Success Story: ना कश्मीर ना हिमाचल! महाराष्ट्रातल्या 'या' गावात सफरचंदाची शेती, शेतकरी मालामाल

अकोल्यात प्रचंड उकाड्यामुळे रस्ते ओस पडले आहेत. अग्रेसर चौक ते रेल्वे स्टेशन परिसर निर्मनुष्य झाल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाने वातानुकूलित 18 बेडची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि महानगरपालिका सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक पायनॅपल ज्यूससह थंड पेयांचा आधार घेत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com