प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Raigad Rain Viral Video : गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. मागील आठवड्यापासून रायगडच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळाही पसरल्याची माहिती आहे. अशातच पन्हळघर झोरेवाडी भागात अचानक ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पन्हळघर झोरेवाडी येथे आज संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. त्यामुळे ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, या ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. तसच येथे काही वेळ जोरदार पाऊस पडला, पण परिस्थिती सामान्य असल्याचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
राज्यातही काही जिल्ह्यांना शक्ती चक्री वादळाचा फटका बसणार असल्याची माहिती समोर आली होती. हे शक्ती चक्रीवादळ 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत काही ठिकाणी घोंगावणार असल्याचं समजते. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर या वादळाचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
नक्की वाचा >> IND vs AUS: आशिया कप जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूंना दिला डच्चू! ODI मध्ये का झाली नाही निवड?