
Team India Squad For ODI Againts Australia : भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3-3 सामन्यांची वनडे आणि टी-20 सीरिज रंगणार आहे. 19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज सुरु होणार आहे. बीसीसीआयने आज शनिवारी 4 ऑक्टोबरला टीम इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा केलीय. वनडे सीरिजसाठी शुबमन गिल कॅप्टन्सीची धुरा सांभाळणार आहे. तर व्हाईस कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यरच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीय. परंतु, नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना या वनडे सीरिजमध्ये संधी देण्यात आली नाहीय. अनेक खेळाडूंना टीम इंडियाच्या नव्या स्क्वॉडमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाहीय.
या खेळाडूंना वनडे सीरिजमध्ये दिला डच्चू
जसप्रीत बुमराह
आशिया कपमध्ये भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आलीय. कारण बुमहरा आशिया कपनंतर आता वेस्टइंडिज विरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरिजसाठी मैदानात उतरला आहे. बुमराहवर अतिरिक्त लोड येऊ नये, यासाठी टीम इंडिया आगामी होणाऱ्या वनडे सीरिजसाठी बुमराहला विश्रांती देऊ शकते.
नक्की वाचा >> रोहित पर्व संपलं? टीम इंडियाला मिळाला नवा कॅप्टन, BCCI ने केली घोषणा, खेळाडूंची लिस्ट वाचा एका क्लिकवर
तिलक वर्मा
आशिया कपच्या फायनल सामन्यात तिलक वर्माने धडाकेबाज फलंदाजी करून नाबाद फिफ्टी केली होती. त्यामुळे तिलक वर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये संधी मिळेल, अशी चर्चा होती. कारण या फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसारखे दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे तिलक वर्माला वनडेत संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.
सूर्यकुमार यादव
टीम इंडियाचा टी-20 चा कॅप्टन सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये अप्रतिम कामगिरी केली. सूर्याच्या खांद्यावर टीम इंडियाची कमान असतानाच त्याने मैदानात धावाही कुटल्या. पण सूर्यकुमार यादव मागील काही महिन्यांमध्ये टीम इंडियाच्या वनडे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारला धावांचा सूर गवसला नाही, त्यामुळे सूर्याला टीम इंडियाच्या वनडेच्या नव्या स्क्वॉडमध्ये समाविष्ट केलं नाही, असं म्हटलं जात आहे.
नक्की वाचा >> Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले
हार्दिक पंड्या
टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी हार्दिक पंड्यालाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी विश्रांती दिली आहे. कारण हार्दिक नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपसाठी मैदानात उतरला होता.तसच हार्दिकला टीम इंडियाच्या टी-20 स्क्वॉडमध्येही सामील केलं नाहीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world