Chhatrapati Sambhajinagar Heavy Rain : सततच्या पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके आणि मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनांची नोंद झाली असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान विभागानुसार, आज छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
अतिवृष्टी झालेल्या मंडळाचे तपशील
• छत्रपती संभाजीनगर तालुका
1. लाडसावंगी – 71.03 मिमी
2. चौका – 100.08 मिमी
3. पिसादेवी – 72.05 मिमी
4. वरुड काजी – 72.05 मिमी
5. शेकटा – 66.03 मिमी
• गंगापूर तालुका
6. शेंदूरवाडा – 65.03 मिमी
7. तुर्काबाद – 74.00 मिमी
8. डोणगाव – 91.08 मिमी
• वैजापूर तालुका
9. लोणी – 117.03 मिमी
10. गारज – 126.05 मिमी
• कन्नड तालुका
11. देवगाव – 86.05 मिमी
आजचे सरासरी पर्जन्यमान: 20.6 मिमी
जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान: 418.4 मिमी
नक्की वाचा - Mumbai School Holiday : मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर; कार्यालयांनाही मिळणार का?
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. परंतु वीज पडल्याच्या घटनांमध्ये काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम फिल्ड ऑफिसरच्या माध्यमातून सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शहर, तालुके आणि गावं ओलेचिंब झाली आहेत. जर असाच पाऊस पुढील काही दिवस चालू राहिला, तर अतिवृष्टीची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचं संकट कोसळलं आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, परंतु पावसाचा जोर वाढल्यास आगामी दिवसांत अडचणी अधिक वाढू शकतात.
मराठवाडा पाऊस परिस्थिती
छत्रपती संभाजीनगर
जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 71
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 2160
शेती नुकसान : 3 हेक्टर
हिंगोली
मयत व्यक्ती :01
जनावरांचा मृत्यू : 16
पडझड झालेली घर-गोठे : 26
बाधित गावं : 185
बाधित शेतकरी : 9023
शेती नुकसान : 10789 हेक्टर
नांदेड
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 181
पडझड झालेली घर-गोठे : 181
बाधित गावं : 363
बाधित शेतकरी : 91559
शेती नुकसान : 84188 हेक्टर
बीड
मयत व्यक्ती : 01
जनावरांचा मृत्यू : 01
पडझड झालेली घर-गोठे : 06
बाधित गावं : 24
बाधित शेतकरी : 1465
शेती नुकसान : 930 हेक्टर
लातूर
पडझड झालेली घर-गोठे : 11
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 161
शेती नुकसान : 184.5 हेक्टर
धाराशिव
जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 108
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर
एकूण मराठवाडा
नांदेड
जखमी :01
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 107
पडझड झालेली घर-गोठे : 350
बाधित गावं : 798
बाधित शेतकरी : 119964
शेती नुकसान : 111420.55 हेक्टर