5 months ago
मुंबई:

Maharashtra Live Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज रविवारी (23 जून) मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्या विहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. त्याशिवाय मुंबईत आज मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील आणि देशभरातील अपडेट वाचा. 

Jun 23, 2024 20:34 (IST)

रायगडमधील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भीषण अपघात, 3 ठार, एक गंभीर जखमी

रायगडमधील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भीषण अपघात, तीन जण ठार, एक गंभीर जखमी

कणघर गावाजवळील घटना

कार झाडावर आदळून उलटल्याने अपघात

मृतांमध्ये एका मुलाचा समावेश तर एक लहान मुलगा गंभीर जखमी

Jun 23, 2024 15:23 (IST)

BSP सुप्रीमो मायावतींनी पुतण्या आकाश आनंद यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

BSP सुप्रीमो मायावतींनी पुतण्या आकाश आनंद यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

बहुजन समाज पार्टीचे सुप्रीमो मायावतीचे पुतणे आकाश आनंद यांना पुन्हा एकदा आपला वारसदार म्हणून घोषित केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मायावतींनी वादग्रस्त वक्तव्यावरून आकाश आनंद यांना साइटलाइन केलं होतं. मायावती यावेळी म्हणाल्या होत्या की, पूर्ण परिपक्वता येईपर्यंत आकाश आनंद यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल. आता आकाश आनंद यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी मायावतींनी आकाश आनंद यांना आपला वारसदार म्हणून घोषित केलं आहे.  

Jun 23, 2024 15:17 (IST)

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटीचा अपघात, 20 ते 22 जणं जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटीचा अपघात, 20 ते  22 जणं जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडाला धडकून अपघात झाला आहे. बसच्या अपघातात 20 ते  22 जणं किरकोळ जखमी झाले आहेत. राज्य परिवहन मार्गाच्या एसटी बसचा अपघात झाला आहे. पुण्यातील सहजपूर फाट्याजवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. महामार्गावर एका थांबलेल्या ट्रक पासून वाचण्यासाठी चालकाने प्रयत्न करताना बस झाडाला धडकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Jun 23, 2024 15:10 (IST)

अलिबाग : पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना 2 मुलं बुडाली

अलिबाग : पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना 2 मुलं बुडाली

अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात 2 मुले बुडाली. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली असून बुडालेल्या मुलांच्या नातेवाइकांचा किनाऱ्यावर आक्रोश सुरू आहे. 

Advertisement
Jun 23, 2024 15:04 (IST)

कृष्णेच्या पात्रात उतरून ग्रामस्थांचं आंदोलन

कृष्णेच्या पात्रात उतरून ग्रामस्थांचं आंदोलन

वाई येथील अनाधिकृत दगड खाण पट्टा व स्टोन क्रशरला बेकायदेशीर परवानगी देण्यात आल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. चुकीची कागदपत्रे पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी कुसगांव ग्रामस्थांनी कृष्णेच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Jun 23, 2024 13:02 (IST)

रिक्षाचालकांचे उद्या राज्यभर आंदोलन, नूतनीकरण विलंब शुल्काविरोधात निषेध

रिक्षाचालकांचे उद्या राज्यभर आंदोलन, नूतनीकरण विलंब शुल्काविरोधात निषेध 

सोमवारी, 24 जून रोजी रिक्षाचालकांनी राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला. कोरोना काळात रिक्षाचालकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. यानंतर वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रूपये प्रतिदिवस याप्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. याविरोधात रिक्षाचालक-मालक संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे. 

Advertisement
Jun 23, 2024 11:53 (IST)

संत सखाराम महाराज दिंडीचं प्रस्थान, भर पावसात 700 वारकऱ्यांच पंढरपूरच्या दिशेने

संत सखाराम महाराज दिंडीचं प्रस्थान, भर पावसात 700 वारकऱ्यांच पंढरपूरच्या दिशेने

पंढरीच्या वारीसाठी आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुनी परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यांची पालखी आज सखारामपुर येथून पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे. यंदा पालखीचे 139 वे वर्ष आहे. जिल्हाभरात काल रात्रीपासून पाऊस आहे आणि अशा पावसात आता या पालखीचं प्रस्थान होत आहे. पालखीत जवळपास 700 वारकरी हाती भगवी पताका व मुखी पांडुरंगाचं नाम घेऊन साडेसहाशे किलोमीटर अंतर पायी चालून जाणार आहेत.

Jun 23, 2024 11:47 (IST)

नीट परीक्षा अचानक रद्द, 1000 विद्यार्थी साताऱ्यात येऊन पुन्हा परतले; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

नीट परीक्षा अचानक रद्द, 1000 विद्यार्थी साताऱ्यात येऊन पुन्हा परतले; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

साताऱ्यात होणारी NEET PG परीक्षा रद्द कऱण्यात आली असून पुढची तारीख अजून पर्यंत कळवली नसल्याने 1000 विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता शासन परीक्षा कधी घेणारं याची अनिश्चितता असून अचानक परीक्षा रद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रासह पालक-विद्यार्थी नाराज झाले आहेत. 

Advertisement
Jun 23, 2024 11:11 (IST)

6 जुलैला मनोज जरांगे यांची हिंगोलीत भव्य रॅली, पाहा कसा असेल दौरा

Jun 23, 2024 11:10 (IST)

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून आज रविवारची शासकीय कार्यालये व शाळांना सुट्टी असल्याने भाविकांनी गर्दी केली आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात कुलधर्म, कुलाचार गोंधळ हे धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यातच सुट्टी असल्याने आज भाविकांनी गर्दी केली आहे. 

Jun 23, 2024 10:15 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी बोलावली बैठक

सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक 

एमआयजी क्लब वांद्रे येथे सकाळी दहा वाजता मनसेची बैठक होणार आहे. मनसेचे नेते ,सरचिटणीस, राज्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रंगशारदा सभागृह वांद्रे येथे झालेल्या बैठकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला होता. उद्याच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सूचना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Jun 23, 2024 10:13 (IST)

दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचं मतदान सुरू

दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचं मतदान सुरू

दक्षिण गोव्यातील बेनौलीम मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्यपदाच्या महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदानाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या या निवडणुकीत इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केला आहे. बेनौलिम हा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. जिथे भारत आघाडीचे उमेदवार विरीएटो फर्नांडिस यांनी भाजपच्या पल्लवी डेम्पोचा पराभव केला. बेनौलीमच्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत आपने इंडिया आघाडीचा भाग म्हणून आपला उमेदवार उभा केला आहे. कॅथलिक बहुल असलेल्या या मतदारसंघात भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही.

Jun 23, 2024 07:49 (IST)

मनोज जरांगे पाटील 6 जुलैला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील 6 जुलैला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील 6 जुलैपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पहिल्या दिवशी शहरातून भव्यसंवाद रॅली काढण्यात येणार आहे. संवाद रॅलीत 2 लाख मराठा बांधव सामील होतील असा सकल मराठा बांधवांचा दावा आहे. जरांगे पाटील यांच्या दौऱ्या संदर्भात हिंगोलीत सकल मराठा बांधवांची नियोजन बैठक पार पडली. 

Jun 23, 2024 07:46 (IST)

क्रूड ऑइलची अफरातफर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

क्रूड ऑइलची अफरातफर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ऑइल मिलमधील 26 हजार किलो क्रूड ऑइलची अफरातफर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी सात आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आलं आहे. शिवाय 26 हजार 115 किलो ग्रॅम राइसब्रान क्रूड ऑइल व टँकर असा एकूण 50 लाख 90 हजार रुपयांचा माल या आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.