Jalna Rain : जालन्यात मुसळधार! मे महिन्यात ओढे, नाल्यांना पूर; वीज पडून दोघांचा मृत्यू

Jalna Rain : मान्सून पूर्व झालेल्या पावसात वादळी वाऱ्याने भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, सिरसगाव मंडप, भायडी या ठिकाणी वीजपडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 बैल, एका गाईचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

जालना : जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले. भोकरदन तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं झालं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मान्सून पूर्व झालेल्या पावसात वादळी वाऱ्याने भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, सिरसगाव मंडप, भायडी या ठिकाणी वीजपडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 बैल, एका गाईचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहुल विठ्ठल जाधव (वय 18, केदारखेडा), रामेश्वर आनंदा कड (वय 35, सिपोराबाजार) असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

(नक्की वाचा- Rain Forecast : राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुण्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)

तर विठ्ठल मुरलीधर जाधव, काकासाहेब जाधव, दुर्गाबाई जाधव, संतोष दळवी, दत्तु दळवी, रामेश्वर बरडे, गणपत दळवीरा, समाधान पिसे अशी जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरु आहेत

((नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल))

नदी-नाल्यांना पूर

जिल्ह्यातील जालना,बदनापूर,घनसावंगी,भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात दीड ते दोन तास मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडालीय. जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यातील  काही गावांमध्ये नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला. उन्हाळ्यातच तळ गाठलेल्या विहिरीत पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे. भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

लातूरला पावसाने झोडपलं 

लातूरच्या रेणापूर तालुक्यात आणि परिसरात तुफान गारपीट आणि पाऊस झाला आहे. तर लातूर ग्रामीणमधील इंदरठाणा येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.  इंद्रठाणा येथील गुणाजी किशन कदम वय 65 वर्ष या सालगड्याचा शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल आहे. 

Topics mentioned in this article