मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; अकोला, पुण्यातील मैदान चाचणी पुढे ढकलली

Police Bharti 2024 : कोल्यानंतर आता पुणे येथील पोलीस भरती तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसताना दिसत आहे. अकोल्यानंतर आता पुणे येथील पोलीस भरती तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोल्यात 8 जुलै रोजी पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. मात्र पावसामुळे ही रद्द करण्यात आली होती. आता पुण्यातील पोलीस भरतीला देखील पावसाचा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलली.

(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा, काय आहे कारण?)

पुणे ग्रामीण येथील मैदान शारीरीक/मैदानी चाचणी घेण्यासाठी योग्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पोलीस भरती पुढे ढकलल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. 9 ते 11 जुलै या कालावधीत होणाऱ्या पोलीस भरतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

(नक्की वाचा - Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्याला आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा)

अमरावतीत महिला उमेदवार आक्रमक

अमरावती ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावर सुरू आहे. मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार मध्यरात्री 3 वाजेपासून दाखल झाल्या आहेत. मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देताना मोठ्या दुर्घटनेला समोर जावे लागू शकते. त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलण्यासाठी महिला उमेदवार आक्रमक झालेल्या आहेत. यासाठी या महिला उमेदवारांनी ठिय्या आंदोलन देखील केलं. पोलिसांच्या अर्वाच्च भाषेवरही महिला उमदेवारांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement