जाहिरात

Traffic Jam: ठाणे बेलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी! कळवा नाका ते ऐरोलीपर्यंत रस्ता जाम, वाचा अपडेट

एका मोठ्या अपघातामुळे कळवा नाक्यापासून ते थेट ऐरोलीपर्यंतचा मार्ग ठप्प झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

Traffic Jam: ठाणे बेलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी! कळवा नाका ते ऐरोलीपर्यंत रस्ता जाम, वाचा अपडेट

Thane- Belapur Road Trafffic: सकाळी सकाळी ऑफिस, कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही ऑफिस किंवा कामानिमित्त प्रवास करणार असाल आणि ठाणे बेलापूर मार्गावरुन जाणार असाल तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. ठाणे बेलापूर महामार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एका मोठ्या अपघातामुळे कळवा नाक्यापासून ते थेट ऐरोलीपर्यंतचा मार्ग ठप्प झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

ठाणे बेलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

कळव्यावरुन ऐरोलीपर्यंत जात असाल तर एक तुमच्या प्रवासाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.  कारण कळवा नाक्यापासून ऐरोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या बेलापूर रोडवर कळव्यावरुन पनवेल-ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर रात्री कंटेनरचा अपघात झाला. डिव्हायडरला धडकलेला टेम्पो पाच तासानंतर बाजूला करण्यात आला. मात्र या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

Sunetra Pawar: दादांप्रमाणे वहिनींचा रुद्रावतार, NCP बैठकीत 'त्या' आमदाराला झाप झापलं

कामावर जाणाऱ्यांचे तर हाल झालेच. मात्र या मार्गावर अनेक शाळा आणि कॉलेज असल्यानं बारावीची परिक्षा देणारे विद्यार्थीही या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कंटेनरचा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्घटनेमुळे सकाळी साडे सात वाजल्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लांगल्या आहेत.

दरम्यान,  याबाबतची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी धाव घेतली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही वाहतूक कोंडी तातडीने सोडवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी गुगल मॅप तपासून वाहतुकीचा अंदाज घ्या किंवा पर्यायी मार्गांचा वापर करा किंवा लोकलचा मार्ग निवडा. 

Crime News: 'हनी ट्र्रॅप' स्टाईल टोळीमुळे नवी मुंबईकर चिंतेत! भीक मागून नागरिकांना बनवतात कंगाल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com