
Thane News : ठाणे आणि बोरिवलीला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि MMRDA अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये रस्त्यांचा विस्तार, फ्लायओव्हर, मेट्रो आणि बोगद्यांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आणि वाहतूकक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
ठाणे-बोरिवली ट्विन ट्यूब टनेल प्रकल्प
एमएमआरडीएचा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो पूर्ण झाल्यावर ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 11.84 किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. यासाठी सुमारे 13,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Thane Ghodbunder Traffic: घोडबंदर रोडवर काय झाले ? रस्ता पूर्ण जाम, 20 मिनिटे गाड्या एकाच जागी उभ्या)
भायंदरपाडा फ्लायओव्हर
हा चार लेनचा फ्लायओव्हर मे 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे मुंबई-ठाणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 15-25 मिनिटांनी कमी झाला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे.
कासारवडावली फ्लायओव्हर
या फ्लायओव्हरचा पहिला टप्पा जुलै 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीला मोठी मदत झाली आहे. याचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
(नक्की वाचा: नागरिकांनो, खड्ड्यांची सवय करा, सुटका नाहीच; महापालिकेची आकडेवारी पाहून होईल अपेक्षा भंग!)
घोडबंदर हायवे विस्तार
600 कोटी रुपयांचा हा प्रकल्प घोडबंदर रोड 60 मीटर रुंद करण्यासाठी आहे. यामुळे वाहतुकीचा वेग सुधारेल. डिसेंबर 2024 मध्ये याची घोषणा झाली, पण काही विरोधामुळे यात विलंब होत आहे. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मुंबई मेट्रो लाइन 4
मेट्रो 4 लाइनचे बांधकाम घोडबंदर रोडवर सुरू आहे. वडाळा ते कासारवडावली पर्यंतची ही मेट्रो पूर्ण झाल्यावर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होईल. सध्या गर्डर लाँचिंगचे काम सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world