जाहिरात

Mumbai Pune Traffic: मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवासाआधी वाचा अपडेट

त्याचबरोबर मतदानामुळेही गावी जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

Mumbai Pune Traffic: मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवासाआधी वाचा अपडेट

Mumbai Pune Expressway Traffic Jam:  गेल्या आठवडाभरापासून मुंबई- पुणे महामार्गावर वाहतुकीचे तीन- तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी मुंबई पुणे एक्स्प्रेसवर टँकर उलटला अन् तब्बल 33 तास वाहतूक ठप्प झाली. या महाभयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. टँकर बाजुला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र आज पुन्हा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी...

मुंबई- पुणे द्रुदगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे हायवेवर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने नागरिक तसेच पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्याचबरोबर मतदानामुळेही गावी जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर मृत्यूचं तांडव टळलं? 36 तास चाललेल्या ऑपरेशनचं भयावह सत्य

वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न...

महामार्गावरील कोंडी सोडवण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक खंडाळा बोगद्याजवळ थांबवून पुण्याकडे जाणारी वाहतूक बोरगाव येथील पोलीस मदत केंद्राजवळील मुंबई मार्गिकेवरुन वळवत पुण्याकडे सोडण्यात येत आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  

(नक्की वाचा: Mumbai Pune Expressway: 6500 कोटी खर्चूनही 36 तासांची महाकोंडी!एक्स्प्रेसवेवर नक्की काय बिनसलंय?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com