जाहिरात

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर मृत्यूचं तांडव टळलं? 36 तास चाललेल्या ऑपरेशनचं भयावह सत्य

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील टँकर अपघाताचे भीषण सत्य तज्ज्ञांनी समोर आणलंय. एक ठिणगी उडाली असती तर क्षणातच होत्याचे नव्हतं झालं असते.

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर मृत्यूचं तांडव टळलं? 36 तास चाललेल्या ऑपरेशनचं भयावह सत्य
"Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील भीषण दुर्घटना घडली असती?"
PTI

Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टँकर उलटल्यानंतर खराब झालेले वॅल्व्ह आणि ज्वलनशील प्रोपलीन गॅसची सतत होणारी गळती यामुळे टँकरमधून गॅस काढण्याचे काम अत्यंत धोकादायक बनले होते, अशी माहिती एका तज्ज्ञाने गुरुवारी (5 फेब्रुवारी) दिली. एक्सप्रेसवेवर मंगळवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या या टँकर अपघातामुळे 30 तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ‘एमईसी इलेक इंडस्ट्रियल सर्व्हिसेस' (MEC Elec Industrial Services) कंपनीच्या तज्ज्ञ पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम बुधवारी (4 फेब्रुवारी) रात्री दीड (AM) वाजता पूर्ण झाले.

"टँकर हटवण्याचे काम कठीण"

एमईसी इलेकचे कार्यकारी संचालक ज्ञानेश दिवेकर यांनी सांगितले की,"वॅल्व्हचे झालेले नुकसान, टँकरमधील अंतर्गत उच्च दाब आणि आसपासच्या परिसरात पसरलेला ज्वलनशील वायू यामुळे उलटलेला प्रोपलीन गॅस टँकर सुरक्षितपणे हटवणे ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि धोकादायक काम ठरले होते."

दिवेकर यांनी 'PTI-भाषा'शी बोलताना सांगितले की, "आमची टेक्नीकल टीम एका तासाच्या आत घटनास्थळी पोहोचली. त्यावेळेस त्यांना आढळले की टँकरचे तीनही मुख्य वॅल्व्ह – दोन लिक्विड वॅल्व्ह आणि एक व्हेपर वॅल्व्ह अपघातात पूर्णपणे खराब झाले होते. यामुळे द्रवरूप प्रोपलीन गॅसची सतत गळती होत होती."

(नक्की वाचा: Mumbai Pune Expressway: 6500 कोटी खर्चूनही 36 तासांची महाकोंडी!एक्स्प्रेसवेवर नक्की काय बिनसलंय?)

एक छोटीशी ठिणगी अन् होत्याचं नव्हतं झालं असतं

दिवेकर पुढे म्हणाले की, प्रोपलीनची किमान स्फोटक मर्यादा (LEL) केवळ दोन टक्के आहे. याचा अर्थ हवेत या वायूचे अत्यल्प प्रमाण मिसळले तरी मोठा स्फोट होऊ शकतो. दिवेकर यांनी सांगितले की, "एक वेळ अशी होती जेव्हा घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावरही एलईएलची 20 टक्के इतक्या प्रमाणात गॅसचे तीव्रता आढळली होती." वाहनांचा सायलेन्सर, मोबाइल फोन किंवा विजेच्या स्रोतातून निघणारी एक छोटीशी ठिणगी देखील मोठ्या आपत्तीला निमंत्रण देऊ शकली असती, असेही त्यांनी नमूद केले.

(नक्की वाचा: Mumbai Pune Expressway Accident:...आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत,एवढं म्हणू नका; सरकारला सुनावले खडेबोल)

(Contenr Source : PTI)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com