जाहिरात

Commander Sagar Borade: कमांडरचे अतुलनीय शौर्य! जीवाची बाजी लावून जवानांचे प्राण वाचवले, स्वतःचा पाय गमावला

सागर बोराडे यांनी अद्वितीय शौर्याची साक्ष दाखवत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

Commander Sagar Borade: कमांडरचे अतुलनीय शौर्य! जीवाची बाजी लावून जवानांचे प्राण वाचवले, स्वतःचा  पाय गमावला

राहुल कुलकर्णी, छत्तीसगड: 4 मे रोजी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील अतिशय धोकादायक KGH टेकड्यांमध्ये सुरू असलेल्या एका उच्च-जोखमीच्या नक्षलविरोधी कारवाईदरम्यान CRPF चे सहाय्यक कमांडर सागर बोराडे गंभीर जखमी झाले. यावेळी सागर बोराडे यांनी अद्वितीय शौर्याची साक्ष दाखवत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या कारवाईचे नेतृत्व CRPF च्या प्रतिष्ठित 204 कोब्रा बटालियनने केले. ऑपरेशनदरम्यान एका जवानाला आयईडी स्फोटात इजा झाली. सहाय्यक कमांडंर बोराडे यांनी कोणताही विचार न करता त्या जवानाला बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. KGH टेकड्या हे अनेक ‘मोस्ट वाँटेड' नक्षल नेत्यांचे आश्रयस्थान मानले जाते, आणि तेथील परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला असून ठिकठिकाणी प्राणघातक आयईडीज लपवलेले आहेत.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बोराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविणे हेच प्राधान्य मानले. मात्र, जवानाच्या मदतीस जाताना ते स्वतःही एका आयईडीवर पाय पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या पायाला मोठी इजा झाली. तातडीने त्यांना रायपूरला हलवण्यात आले आणि त्यानंतर दिल्लीत एअरलिफ्ट करण्यात आले. वैद्यकीय सल्ल्यानुसार, संसर्ग रोखण्यासाठी त्यांचा डावा पाय वैद्यकीय कापणे आवश्यक ठरले.

(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)

सध्या सहाय्यक कमांडर सागर बोराडे यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि कर्तव्यनिष्ठा हे भारताच्या सुरक्षा दलांच्या अदम्य आत्म्याचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या या धाडसी वृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान,  KGH टेकड्यांमधील कारवाई सुरूच असून, सुरक्षा दल नक्षलवादींच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत.

(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com