जाहिरात

Festival Day Health Tips: सणासुदीची मिठाई मुलांच्या आरोग्याला घातक! खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

What to be careful about while buying festive sweets: दिवाळीची मिठाई खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे? जाणून घ्या याबाबतचा स्पेशल रिपोर्ट..

Festival Day Health Tips: सणासुदीची मिठाई मुलांच्या आरोग्याला घातक! खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

अभय भुते, भंडारा

Food And Sweet Drug administration Festival Day Health Tips: दसरा, दिवाळी जवळ आली की बाजारपेठेत मिठाई आणि खाद्यतेल खरेदीची लगबग सुरू होते. पण या गोडधोडात भेसळीचा कडवटपणा मिसळल्याचे चित्र समोर येत आहे. भेसळयुक्त मिठाई आणि खाद्यतेल लहान मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहेत. दिवाळीची मिठाई खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे? जाणून घ्या याबाबतचा स्पेशल रिपोर्ट..

सणासुदीची खरेदी करताना काय काळजी घ्यावी? What to be careful about while buying festive sweets?

दिवाळी म्हटली की मिठाई आणि फराळाचा महापूर असतो. पण या गोड सणामध्ये भेसळीचे सावट गडद होत चाललं आहे. बाजारात विक्रीस असलेले बरेचसे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे अन्नसुरक्षा विभागाच्या तपासणीत दरवर्षी दिसून येतात. दिवाळीत लाखो रुपयांची मिठाई बाजारात विक्रीस येते. पण या गोडधोडात अनेकदा कृत्रिम रंग, भेसळयुक्त साखर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरले जाते. 

Daughters Day 2025: मुली वडिलांच्या जास्त लाडक्या का असतात? संशोधकांनी सांगितलं खास कनेक्शन

चव आकर्षक वाटली तरी त्यामागे लपलेले रसायन हे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. आणि याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर दिसून येतो. भेसळयुक्त पदार्थ सेवन केल्यास मुलांना पोटदुखी, उलट्या-जुलाब, त्वचेवर ऍलर्जी, भूक मंदावणे अशा तक्रारी वाढतात. वारंवार अशा पदार्थांचे सेवन झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो." असं भंडाऱ्याचे बालरोगतज्ज्ञ यशवंत लांजेवार यांनी सांगितले आहे. 

याबाबतचं भंडाऱ्याचे  अन्न व औषध प्रशासन अधिकारी  यदुराज दहातोंडे यांच्यातर्फे आरोग्य विभागाने देखील आवाहन केले आहे की बाजारात उपलब्ध अतिशय रंगीत, अत्यल्प किमतीत मिळणारी मिठाई टाळावी. विश्वासार्ह ब्रँडचे तेल आणि गोडधोडच वापरावा." भंडारा अन्न आणि औषध प्रशासनाने याची तपासणी सुरू केली असून आता पर्यंत 16 दुकानातील नमुने तपासणीला पाठविले आहे.. यात मिठाई किंवा खाद्य तेलात भेसळ आढळून आली तर अशा दुकानांवर कारवाई केली जाणार असल्याचं इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )

मुलांमध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब, त्वचेवर ऍलर्जी, तसेच भूक मंदावणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
सतत भेसळयुक्त खाद्यतेल व गोड पदार्थ सेवन केल्यास लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो.
भेसळीत वापरले जाणारे काही रसायने यकृत, मूत्रपिंड व मेंदूच्या कार्यावर देखील विपरीत परिणाम करू शकतात.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com