
History researcher Indrajit Sawant : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप इंद्रजित सावंत यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. इंद्रजित सावंत यांना फोन करणारी ती व्यक्ती आपलं नाव प्रशांत कोरटकर सांगत आहे. त्यांनी सावंत यांना शिवीगाळ करत खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोपही केला आहे. ब्राह्मणद्वेष पसरवू नका अन्यथा याद राखा अशी धमकी फोन करून दिल्याने खळबळ उडाली आहे. इतिहासप्रेमींमधून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सावंत यांना धमकीचा फोन करणारा व्यक्ती नेमकं कोणाच्या सांगण्यावरून करत होता का असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार कोरटकर या व्यक्तीने एका ब्राह्मणद्वेष पसरवत आहात असा आरोप सावंत यांच्यावर केला आहे. इतिहासाची माहिती देऊन ब्राह्मणांच नाव खराब करत आहात त्यामुळे याद राखा अशी विचारणा देखील केली आहे. सावंत यांनी रात्रीच्या सुमारास आलेला हा कॉल रेकॉर्ड देखील केला आहे. त्यानंतर त्यांनी हे रेकॉर्डिंग सोशल पोस्ट केल्याचही सांगितलं. या रेकॉर्डिंगमध्ये कोरटकर या व्यक्तीने शिवीगाळ आणि आरोप केल्याचं ऐकू येत आहे.
कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषण...
इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या कॉल रेकॉर्डिंगनुसार, ही व्यक्ती सावंत यांना कॉल करून तुम्ही 'ब्राह्मणद्वेष का पसरवत आहात' अशी विचारणा करते. त्यानंतर सावंत यांनी त्याला याबाबत 'तुम्ही कोण बोलत आहात आणि हा असा आरोप का करत आहात' असं विचारलं. यावर ती व्यक्ती सावंत यांना म्हणते, "साहेब तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री आणि शासनामध्येच आहात हे विसरू नका.. याद राखा अशी ब्राह्मण विरोधी वक्तव्य करू नका. आज बाजीप्रभू देशपांडे नसते तर छत्रपती शिवाजी महाराज नसते. ब्राह्मणांवर बोलून काही होणार नाही. साहेब इतिहास वाचा. तुम्ही कुठेही असा, पण ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका. तपासून पहा. कोणत्या संदर्भानुसार तुम्ही बोलत आहात. कोणता विदेशी व्यक्ती इतिहास लिहिण्यासाठी आलेला? " अशी सुरुवात करीत शेवटी संभाषणात शिवीगाळ होत असल्याचं दिसत.
नक्की वाचा - घरावर लेकींचं नावं; मराठवाड्यातील एका लहानग्या गावात 'स्त्री'चा आगळावेगळा सन्मान
इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया...
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अशा धमक्याना घाबरणार नाही. इतिहास समाजासमोर मांडणं हे माझं काम आहे. महापुरुषांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. हे गांभीर्याने घ्यायला हवं. पण या अशा लोकांचा उन्माद सुरूच आहे हे दिसून आलंय. संबंधित व्यक्तीचं प्रोफाइल पाहिलं तर असं वाटत की याला राजकीय पाठबळ असावं. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री लाभले पण कुणी जातीवाद केला नाही. आताचे मुख्यमंत्री असं काही करतील असं मला तरी वाटत नाही.
संभाजी महाराजांविरोधात कोणी कट रचला, इंद्रजित सावंत यांचा दावा काय?
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटानंतर नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कट कोण रचला यावरुन वाद सुरू झाला आहे. इंद्रजित सावंत यांनी संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना फ्रान्सिस मार्टिन याची डायरीचा दाखला दिला आहे. मार्टिन हा त्यावेळी पॉडिचेरीचा गव्हर्नर होता. तो त्यावेळी राजापूरमध्ये होता. राजापूर आणि संगमेश्वर जवळ आहे. त्याला स्वराज्याच्या बातम्या कळत होता. त्याने डायरीत लिहून ठेवल्याप्रमाणे संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राम्हण कारकुनाने पकडून दिलं. एवढच नाही तर ब्राम्हण कारकुनाने मुघल सेनापतीशी त्याच्याशी आधीच संधान बांधलं होतं. संभाजी महाराजांविरोधात एक मोठा कट आखण्यात आला होता. यामध्ये त्यांचे सहकारकून सामील होते. यात कोण सहकारकून होते याचा उल्लेख मिळत नाही, असं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world