How to Search Your Name In Voter List: मतदार यादीत नाव शोधण्याचा सोपा पर्याय, ऑफलाईनही शोधू शकता नाव

How to Search Your Name In Voter List: जे नागरिक ऑनलाइन पद्धतीने नाव तपासू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधाही उपलब्ध आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

How to Search Your Name In Voter List: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी या निवडणुकांसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती, त्यात तुमचे नाव तपासण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याप्रमाणे, 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या तारखेला अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचा आधार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीसाठी घेण्यात आला आहे.

नक्की वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर होणार? निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाईन पद्धतीने कसे तपासायचे ? 

मतदार यादी तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत सुलभ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मतदारांना https://mahasecvoterlist.in/ या  संकेतस्थळाला भेट देऊन आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही हे तपासता येईल. याव्यतिरिक्त, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीचे विभाग व गणनिहाय तसेच नगरपरिषद व नगरपंचायतीसाठीचे प्रभागनिहाय यादीतील नाव शोधण्याची  लिंक https://mahasec.maharashtra.gov.in/ या राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. यामुळे घरबसल्या आपले नाव शोधणे शक्य झाले आहे.

नक्की वाचा: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

मतदार यादीची पीडीएफ कशी मिळवायची ?

जे नागरिक ऑनलाइन पद्धतीने नाव तपासू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधाही उपलब्ध आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. नगरपरिषद आणि नगरपंचायतीची यादी संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल. या यादीची प्रत घेण्यासाठी प्रतिपृष्ठ 2 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. याव्यतिरिक्त, प्रारूप आणि अंतिम मतदार यादीची विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करता येईल. सर्व मतदारांनी आपले नाव वेळेत तपासावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कसं शोधाल मतदारयादीत नाव?

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच नाव शोधता येईल.

Advertisement
संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा  EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.

मतदारांसाठी नवीन मोबाईल ॲप

मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या ॲपमधून मिळू शकेल.