जाहिरात

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढेंचा संघर्षमय प्रवास आता पुस्तकातून; प्रकाशनापूर्वीच 1 लाख प्रतींचं बुकिंग

२५ बदल्या आणि धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे लवकरच पुस्तकरुपात नागरिकांच्या भेटीला येणार आहेत.

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढेंचा संघर्षमय प्रवास आता पुस्तकातून; प्रकाशनापूर्वीच 1 लाख प्रतींचं बुकिंग

Book on Tukaram Mundhe : २५ बदल्या आणि धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे लवकरच पुस्तकरुपात नागरिकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन होण्याआधीच १ लाख प्रतींच बुकिंग झालं आहे.

तुकाराम मुंढे यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही. विशेष म्हणजे त्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाचं नाव 'तुकाराम' आहे. आयएएस झाल्यावर पारदर्शक प्रशासनाच्या आग्रहामुळे त्यांची २० वर्षात तब्बल २५ वेळा बदली करण्यात आली. त्यांच्या याच संघर्षमय आयुष्याचा वस्तुनिष्ठ आढावा 'तुकाराम' या पुस्तकात घेण्यात आला आहे. या पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलंय...

'अरे तुकाराम तर लढवय्या आहे. त्याने चक्क मृत्यूला परतवून लावलेय...'

उजाडून पाचेक तास लोटले असावे..रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने भोवताल हादरवून सोडला होता. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा कुठल्या तरी अनपेक्षित संकटाची नांदी देत होत्या. त्याचवेळी एका काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर एक चिमुकला खेळात दंगला होता... खेळता खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला... दुमड्या पायाने आणखी पुढे सरकू लागला... त्याने बेमालूमपणे पाय पुढे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी खाली अंगणातल्या दगडी चौकावर कोसळला. निपचित पडला... कानामागून रक्त वाहायला लागलं... अवघे अंगण लाल झाले... सारा वाडा हादरला.. माजघरातून आई किंचाळतच बाहेर पडली... तुकाराम...

जवळ जवळ निष्प्राण झालेले त्याचे शरीर आईने ओंजळीस धरून आत आणले आणि अचानक तिला जाणवले... अरे तुकाराम तर लढवय्या आहे. त्याने चक्क मृत्यूला परतवून लावलेय...

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com