IAS Pooja Khedkar : कोणत्या गोष्टी पूजा खेडकरांना नडल्या? 10 मुद्द्यात समजून घेऊ!

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना UPSC ने मोठा दणका दिला आहे.  

Advertisement
Read Time: 2 mins
  1. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना UPSC ने मोठा दणका दिला आहे.  UPSC ने पूजा यांना दोषी ठरवलं असून त्यांची उमेदवारीही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. UPSC ने पूजा खेडकर यांना  30 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिली होती. परंतू पूजाने याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी पूजा खेडकर यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  पूजा खेडकरांविरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर त्यांना यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा दोषी ठरण्याची काही कारणं पुढीलप्रमाणे...
  2. पूजाने नावे बदलून बारा वेळा परीक्षा दिली
  3. मसुरीतही गैरवर्तणुकीचे आठ मेमो
  4. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिली. 
  5. परीक्षा देताना स्वतःचे वडील आणि आईचे नाव बदलल्यानेच हा कारनामा करता आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
  6. मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही त्यांना गैरवर्तणुकीसाठी आठ वेळा मेमो बजावण्यात आले होते. 
  7. परीक्षा देताना पूजा यांनी स्वतः नऊ वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरले.  तीनवेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरले.
  8. वडिलांच्या नावात सात वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा, दोनवेळा खेडकर दिलीप के, एकवेळा दिलीप खेडकर, एकवेळा दिलीप के. खेडकर, तर एकवेळा दिलीप खेडकर असा बदल केला. आईचे नाव चार वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, तीनवेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, दोनवेळा बुधवंत मनोरमा जे. आणि तीनवेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला.
  9. या नोटिशीत पूजा खेडकर यांनी 2022 मध्ये ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतला
  10. वडील सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग 1 अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ 8 लाखांपेक्षा कमी नव्हते