जाहिरात

Pune News : गुढीपाडव्याला पुण्यात धो धो; हवामान विभागाकडून वादळी पावसाचा इशारा

अचानक येणाऱ्या या पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.​​​​​​​

Pune News : गुढीपाडव्याला पुण्यात धो धो; हवामान विभागाकडून वादळी पावसाचा इशारा

Pune News : सध्या राज्यभरात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यातील तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून चढाच आहे. दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणेकरांनो सावध राहा...

येत्या १८ ते १९ मार्चदरम्यान पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या १८ आणि १९ मार्च रोजी पुणे आणि परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना १८ ते १९ मार्च रोजी हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. अचानक येणाऱ्या या पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी तयारीनिशी घराबाहेर पडावे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com