Ahilyanagar News: बिबट्यापासून संरक्षणासाठी भन्नाट आयडिया; 5 वीतल्या मुलीने बनवली जबरदस्त 'काठी'

VIRAL Video: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आराध्या आशिष निंबोरे या पाचवीच्या विद्यार्थिनीने ही आयडिया शोधून काढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सध्या पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतात काम करणारे शेतकरी असोत किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी, सर्वांनाच जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी बिबट्याची दहशत कायम आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या संरक्षणासाठी काय करता येईल, याचा विचार करून अहिल्यानगरमधील एका पाचवीच्या विद्यार्थिनीने बिबट काठी नावाचे एक अनोखे उपकरण तयार केले आहे.

कोण आहे ही चिमुकली?

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आराध्या आशिष निंबोरे या पाचवीच्या विद्यार्थिनीने ही आयडिया शोधून काढली आहे. राशीन येथे आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनात तिने हे उपकरण सादर केले. तिचे शिक्षक नवनाथ धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही 'बिबट काठी' विकसित केली असून, विज्ञान प्रदर्शनात या उपकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

VIDEO

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

काय आहे 'बिबट काठी'?

आराध्याने तयार केलेली ही काठी केवळ चालण्यासाठी आधार नाही, तर ते एक सेल्फ डिफेन्स साधन आहे. शेतकरी आणि जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रात्रीच्या वेळी उपयुक्त ठरणार आहे. बिबट्या किंवा इतर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास, या काठीच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो, असा दावा आराध्याने केला आहे. या काठीची डिझाइन वन्य प्राण्यांना दूर ठेवण्यास मदत करेल.

आमदार रोहित पवारांनी घेतली दखल

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या विद्यार्थिनीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांनी आराध्याचे कौतुक करताना म्हटले की, "राज्यात बिबट्यांची संख्या आणि मानवावरील हल्ले वाढले असताना सरकारला अद्याप मार्ग सापडत नाहीये. अशा वेळी माझ्या मतदारसंघातील या चिमुकलीने केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. तिचे व्हिजन भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी तिला मदत करेल."

Advertisement

Topics mentioned in this article