Inspirational Story : अनेकदा आयुष्यात आपल्याला अशी एखादी प्रेरणा मिळते, ज्यामुळे आपलं अख्खं आयुष्यच बदलून जातं. असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या भेटीची कहाणी शेयर केली आहे. जी कहाणी वाचून लोक भावुक झाले आहेत. वाहतूक खोळंब्यामुळे त्रस्त झालेली एक व्यक्ती रात्री ९ वाजता पेट्रोल पंपावर आपल्या गाडीत इंधन भरवून घेण्यासाठी पोहोचली. तब्बल ४५ मिनिटात अवघे ४ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर तो थकलेला आणि वैतागला होता. मात्र पेट्रोल पंपावर त्याची भेट अशा एका विद्यार्थिनीसोबत झाली, त्यानंतर त्याचा विचार बदलला.
अभ्यासासह नोकरीचीही जबाबदारी...
पेट्रोल भरत असताना त्या व्यक्तीने विद्यार्थिनीशी बातचीत सुरू केली. ही मुलगी रायगडची राहणारी आहे आणि कॉलेजसाठी शहरात आली आहे. ती दिवसभर कॉलेज करते आणि सायंकाळी पेट्रोल पंपावर नोकरी करते. तिची ड्यूटी रात्री १० वाजेपर्यंत असते. इतकच नाही तर शनिवार आणि रविवारी ती डबल शिफ्टमध्ये काम करते. यातून ती कॉलेजची फी आणि बाकीचा खर्च पूर्ण करते.
विद्यार्थिनीची मेहनत पाहून हैराण व्हाल...
तरुणीची कहाणी ऐकून तो हैराण झाला. त्याने सोशल मीडियावर लिहिलंय, बऱ्याचदा लोक वाहतूक कोंडी, महागाई, ऑफिरमधील ताण यांसारख्या लहानसहान गोष्टींच्या तक्रारी करतात. मात्र जेव्हा कधी तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीशी बोलता जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत असेल तर आपल्या समस्या लहान वाटू लागतात. त्याने लिहिलंय, विद्यार्थिनी कोणत्याही तक्रारीशिवाय अभ्यास आणि नोकरी दोन्ही सांभाळत आहे. ती दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या मेहनतीने भविष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Dude… this is what inspiration looks like. ❤️
— Vineeth K (@DealsDhamaka) August 1, 2026
You don't have to search for it. It's literally everywhere.
I was at a Shell pump today, filling petrol ⛽️ for my car. A little frustrated with the traffic, took me 45 minutes to drive just 4 km to reach the pump. Petrol was… pic.twitter.com/PvncG5Wu07
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीने विद्यार्थिनीला शिक्षणासंबंधित काही मदत हवी असेल तर कळवण्याची विनंती केली. काही लोक केवळ प्रेरणा देत नाही तर त्यांना पाहूनच दुसऱ्यांना मदत करावंस वाटतं.
ही कहाणी सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. याची स्वतंत्र पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र यातून एक मोठा संदेश नक्की मिळतो. कठोर परिश्रम, स्वावलंबन आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढनिश्चय हे कोणत्याही आव्हानापेक्षा मोठे असतात. म्हणूनच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या विद्यार्थ्याची कहाणी इतकी लोकप्रिय झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world