Satara News : साताऱ्याचं चित्र बदलणार! मंत्रिमंडळाच्या एका निर्णयामुळे मुंबई-पुण्यात जाण्याची गरज संपणार...

सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे सातारकरांना मोठा फायदा होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Satara News : आयटी पार्कमुळे शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूरसह देशभरात विविध आयटी पार्क उभे राहिले. ज्यामुळे रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध झाल्या. आता सातारा जिल्ह्यातही आयटी पार्क उभारलं जाणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२.५५ हेक्टर आर. जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही जमीन एमआयडीसीला शेत जमिनीच्या दराने देण्यात येणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News: मेट्रो मार्गिका 5 A ला मंजुरी, दुर्गाडी - कल्याण -उल्हासनगर प्रकल्पामुळे या भागातील लोकांना फायदा

साताऱ्यातही रोजगाराच्या संधी...

सातारा जिल्ह्यासह परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी यासाठी मौजे नागेवाडी (ता.सातारा) येथे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास मौजे नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ मधील ४२.५५ हे.आर. इतकी शासकीय जमीन देण्यात येणार आहे. ही जमीन सध्याच्या शेत जमिनीच्या बाजारभावाने एमआयडीसीला खरेदी करावी लागणार आहे. ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून एमआयडीसीला मिळणार आहे. या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांना प्रकल्प उभा करता येणार असल्याने या परिसरातील अभियांत्रिकी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना स्थानिकरित्या व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात नागपूर - मिहान आयटी पार्क, पुणे - एमएडीसी, मुंबई - नेस्को आयटी पार्क (गोरेगाव), पुणे - एसपी इन्फोसिटी, मुंबई - सीप्झ, नवी मुंबई - मिलेनियम बिझनेस पार्क यासारखे आयटी पार्क उभारण्यात आले आहेत. यामध्ये आता साताऱ्याची भर पडणार आहे.  
 

Topics mentioned in this article