जाहिरात

Mumbai News: मेट्रो मार्गिका 5 A ला मंजुरी, दुर्गाडी - कल्याण -उल्हासनगर प्रकल्पामुळे या भागातील लोकांना फायदा

मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

Mumbai News: मेट्रो मार्गिका 5 A ला मंजुरी, दुर्गाडी - कल्याण -उल्हासनगर प्रकल्पामुळे या भागातील लोकांना फायदा
Mumbai Metro 5 A Latest News Update

Mumbai Metro 5 A Latest News :  मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. नागपूर-गोंदिया,भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी टप्पा २ मधील १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावालाही फडणवीस यांनी मंजूरी दिली.

मंत्रालयात मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

नक्की वाचा >> Kalyan News: भाजप पदाधिकाऱ्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला, 6 आरोपींची नेवाळी भागात काढली धिंड, प्रकरण काय?

69 लाख लोकांना फायदा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ,टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी  ३४.२१ किमी आहे,ज्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. टप्पा १ कापूरबावडी ते धामणकर नाका,टप्पा २ धामणकर नाका ते दुर्गाडी,मार्गिका ५अ दुर्गाडी -कल्याण –उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे,भिवंडी,कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख लोकांना फायदा होणार असून प्रवास वेळेत ४०-५०% बचत होईल.या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र  शासन व संबधित विभागाकडे गतीने कार्यवाही करावी.

नक्की वााचा >> Pune News : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सत्र न्यायालयात काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com