मनोज सातवी, प्रतिनिधी
खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून झालेल्या अपघातात नालासोपाऱ्यातील पराडकर कुटुंबाचा दुदैवी अंत झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील आई- वडील आणि मुलगा असा तिघांचा मृत्यू झाल्याने नालासोपाऱ्यातील रमेश हाईट्स सोसायटी परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये परमेश पराडकर (52), त्यांची पत्नी मेधा पराडकर (49) आणि मुलगा सौरभ पराडकर (27) यांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे येथील रमेश हाईट्स इमारतीत मागील पाच ते सहा वर्षांपासून राहत होते. त्यांचे इमारती मधील सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाने इमारती मधील राहिवासीयांनी शोक व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : रात्री शिळं चिकन-मासे खाल्ले, सकाळी मळमळ; काही तासात महिलेचा मृत्यू
नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे येथील पराडकर कुटुंब त्यांच्या जवळच्या नात्यातील एका व्यक्तीचे निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पराडकर कुटुंबीय देवरुखला निघाले होते. यावेळी भाईंदर येथील मोरे कुटुंबीय सोबत होते. मुंबई गोवा महामार्गावर देवरुख येथे जाताना खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून त्यांची कार थेट दोन पुलांमध्ये जगबुडी नदीपात्रात कोसळून अपघात झाला. त्यात नालासोपारा येथे राहणाऱ्या पराडकर कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, मोरे कुटुंबातील मिताली विवेक मोरे, (45) निहार विवेक मोरे, (19) श्रेयस राजेंद्र सावंत, ( 25 ) यांचा देखील जागीच मृत्यू झाला असून केवळ विवेक श्रीराम मोरे वय ( ४७ ) हे या भीषण अपघातातून बचावले आहेत.