जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar : रात्री शिळं चिकन-मासे खाल्ले, सकाळी मळमळ; काही तासात महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणातून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : रात्री शिळं चिकन-मासे खाल्ले, सकाळी मळमळ; काही तासात महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणातून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 33 वर्षीय ललिता पालवीया या महिलेचा मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शहागड फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. यातील सव्वाशे वीटभट्टीवर काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील परप्रांतीय मजूर आले आहेत.  शनिवारी रात्री या कामगारांनी चिकन, मटण, मासे असं अन्न खाऊन झोपी गेले. सकाळी उठल्यावर कामगारांना त्रास होऊ लागला. त्यातील काहींना चक्कर येणे, उलटी, मळमळ सारखा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांकडे गेले असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. 

Mumbai Goa Highway : वडिलांच्या अंत्यसंस्काराला लेक तातडीने निघाली, काळाने रस्त्यातच गाठलं; 5 जणांचा करूण अंत

नक्की वाचा - Mumbai Goa Highway : वडिलांच्या अंत्यसंस्काराला लेक तातडीने निघाली, काळाने रस्त्यातच गाठलं; 5 जणांचा करूण अंत

यामुळे एकच खळबळ उडाली. यापैकी ललिता पालवीया या महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. तिला पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तर इतर सर्व कामगार आणि त्यांच्या लहान मुलांना उपचारासाठी पैठण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com