- मंगेश जोशी, जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोर भाजपमधूनच बंडखोरी करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले करण पवार यांनी आव्हान उभे केले होते. करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या लोकसभा मतदारसंघावर भाजपाची सत्ता आहे. 2019मध्ये भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मतदानाच्या अवघ्या काही दिवसाआधी स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून भाजपने ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र यावेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी न देता भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले उन्मेश पाटील आणि पारोळ्याचे भाजपचे नगराध्यक्ष करण पवार हे नाराज होते.
(Raver Lok Sabha Election 2024: रावेर लोकसभा मतदारसंघाचा किल्ला खडसे राखणार का?)
तर एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जळगावमध्ये उमेदवार मिळत नसल्याने भाजपमध्ये नाराज असलेले उन्मेश पाटील व करण पवार यांना आपल्या गळाला लावले आणि करण पवार यांना उमेदवारी देऊन स्मिता वाघ यांच्यासमोर भाजपच्याच बंडखोराचे आवाहन उभे केले.
त्यामुळे भाजपच्याच विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी सरळ लढत जळगाव लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली. तर उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करण पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे करण पवार हे विजय मिळवतील, असं चित्र सुरुवातीला निर्माण झालं होतं. मात्र जस जसा प्रचाराचा वेग वाढला वाढला तसतशी दोन्ही उमेदवारांमधील चुरस देखील वाढत गेली.
(धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? सुभाष भामरे की शोभा बच्छाव)
प्रचारातील मुद्दे काय?
जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने बेरोजगारी, स्थानिक उद्योग व्यवसाय, एमआयडीसी व यासह धरण व सिंचन प्रकल्प हे मुद्दे प्रचारात लक्षवेधी ठरले असून त्यामुळे स्मिता वाघ करण पवार यांना टक्कर देणार की उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा उपयोग करण पवार यांना होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
(युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?)