जाहिरात

Nandurbar Lok Sabha Election 2024: युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभांचा धडका येथे पाहायला मिळाला.

Nandurbar Lok Sabha Election 2024: युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?
- प्रशांत जव्हेरी, नंदुरबार 

Nandurbar Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विशेष असा इतिहास आहे. 2014पूर्वी नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. कारण यापूर्वी कोणत्याही पक्षाचा नेता येथे विजयी झाला नव्हता. 2014मध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला ढासळला.

लोकसभा निवडणूक 2024मध्ये या मतदारसंघात दोन उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे. महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित (Heena Gavit) आणि काँग्रेसचे अ‍ॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi)  यांच्यात लढत आहे. दरम्यान या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. मतदानाच्या वाढलेल्या या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणाार आहे.   

एकेकाळी काँग्रेसचा होता बालेकिल्ला

वर्ष 1980 ते 2009पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. माणिकराव गावित हे येथील खासदार होते. 2014मध्ये देशात मोदी लाट आल्याने काँग्रेसचा विजयरथ रोखला गेला. वर्ष 2014मध्ये भाजपने हिना गावित यांना येथून तिकीट दिले. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांचा पराभव करुन भाजपाने आपले खाते उघडले. 2014 पूर्वी येथे केवळ काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 2014मध्ये भाजपने येथून आपले खाते उघडले आणि काँग्रेसचा विजयरथ रोखण्यात यश मिळवले. 2019 मध्ये भाजपने हिना गावित यांना तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या.

(दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?)

नंदुरबार लोकसभेतील जातीय समीकरण काय आहेत?

नंदुरबार मतदारसंघात एसटी प्रवर्गाचे सर्वाधिक मतदार आहेत. वर्ष2011च्या जनगणनेनुसार, या जागेवर एसटी मतदारांची संख्या सुमारे 12,00,191 होती. त्यावेळेस अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे 67 हजार 103 होती, जी एकूण लोकसंख्येच्या 3.5 टक्के होती. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या 1 लाख 06 हजार 263 इतकी होती. लोकसंख्येचा विचार केला तर त्यावेळेस जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 5.5 टक्के होता.

(Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार)

नंदुरबार लोकसभेच्या वैशिष्ट्ये

- नंदुरबार लोकसभा मतदार संघात आदिवासी समाजाचे मोठे प्राबल्य 
- आदिवासींची मते ठरतात निर्णायक 
- 2014मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला 
- भाजपची जागा राखण्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेऊन भाजपचे पारड जड करण्याचा प्रयत्न 
- काँग्रेसकडूनही प्रियंका गांधींची सभा घेऊन मतं खेचून आणण्याचा प्रयत्न

  वर्ष 2019 वर्ष 2014

 उमेदवार 

हिना गावित Vs के.सी. पाडवी हिना गावित Vs माणिकराव गावित

 एकूण मतदार 

 18,71,099 16,72,943

 वैध मतांची एकूण संख्या 

 12,81,738  11,16,676

 विजयी उमेदवाराला मिळालेली मतं

 हिना गावित - 6,39,136 हिना गावित - 5,79,486

VIDEO: केंद्रीय निवडणूक आयोग भाजपाची शाखा, राऊतांनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
Nandurbar Lok Sabha Election 2024: युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?
Dharmaraobaba Atram daughter bhagyashree-atram-joins-ncp-sharad-pawar-faction
Next Article
'बाबा वाघ तर मी वाघीण, वाघीण जास्त घातक' धर्मरावबाबांच्या लेकीचं पहिलचं भाषण गाजलं