- मंगेश जोशी, जळगाव
बारामती लोकसभा मतदारसंघानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघाकडे. रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी यंदा या लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मराठा कार्डचा वापर करत नव्या कोऱ्या उमेदवाराला अर्थात रावेरमधील उद्योजक श्रीराम पाटील यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे राज्यात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि पक्ष फुटीची सहानुभूती यासह दलित को मुस्लिम वोटिंगच्या गणितानुसार श्रीराम पाटील त्यामुळे रक्षा खडसे यांच्यासमोर एक मोठा आवाहन निर्माण झाले होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीच्या निर्णयामुळे मतदार संघातील सर्व राजकीय गणित पुन्हा बदलल्याने रक्षा खडसे यांना मोठे पाठबळ मिळाले.
(धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? सुभाष भामरे की शोभा बच्छाव)
एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निरोप घेऊन भाजपामध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांबरोबर राहणे पसंत केल्याने रोहिणी खडसे यांनी भावजय रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार केला. असे असले तरी शरद पवार यांनी सावध भूमिका घेऊन आपले उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघात जातीने लक्ष घालून दोन वेळा रावेर लोकसभा मतदारसंघाचे दौरे केले व चार ठिकाणी सभा देखील घेतल्या. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली.
(युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?)
श्रीराम पाटील यांना होणार फायदा?
2019च्या तुलनेत रावेर लोकसभा मतदान संघात मतदानाची टक्केवारी काहीशी वाढली असली तरी मात्र याचा फायदा हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. तर एकनाथ खडसे यांच्या निर्णयामुळे लेवा पाटीदार गुजर तर काही अंशी मराठा असे जातीय समीकरण हे रक्षा खडसे यांच्याकडे झुकल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तर 2019मध्ये रक्षा खडसे ह्या सव्वातीन लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी विजयी झाल्या होत्या मात्र यावेळीची चुरस पाहता काटे की टक्कर रावेर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते.
(दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?)
प्रचारातील प्रमुख मुद्दे
रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी असून केळी पीक विमा, केळीला फळाचा दर्जा व केळी उत्पादक शेतकऱ्यांची विविध प्रश्न यासह केळीवर आधारित उद्योग व्यवसाय, स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न बोदवड व वरणगाव जलसिंचन योजनेचा प्रश्न हे प्रमुख मुद्दे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात पाहायला मिळाले. त्यामुळे अत्यंत चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत शरद पवारांचा श्रीराम की खडसेंची सून रक्षा बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागला आहे.
Loksabha Result 2024 | पब्लिक पोल | रक्षा खडसे की श्रीराम पाटील रावेरमध्ये कोण मारणार बाजी?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world