
मंगेश जोशी, जळगाव: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर निवड झाली. या निवडीनंतर जळगावमध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा नागरी सरकार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यात बोलताना उज्जल निकम यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवावरुन मोठे विधान केले.
काय म्हणाले उज्वल निकम?
"जोपर्यंत मी राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाब विरुद्ध लढणारा योद्धा अशी माझी प्रतिमा होती मात्र लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो त्यावेळी 26/11 च्या हल्ल्यात करकरे कामटे व साळस्कर यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने नव्हे तर राजकीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारल्याचा व मी देशद्रोही असल्याचा आरोप झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेचा संताप झाल्याने आपला पराभव झाल्याचे," खासदार उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
Jalgaon Politics: ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; रक्षा खडसेंसाठी धोक्याची घंटा?
यावेळी बोलताना उज्ज्वल निकम यांनी गिरीश महाजन- एकनाथ खडसे वादावरुनही महत्त्वाचे विधान केले. मी प्रत्येकाला लिमिटपर्यंत येऊ देतो लिमिट क्रॉस करू देत नाही, लिमिट क्रॉस केली की मग आरोप प्रत्यारोप होतात,जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे म्हणत खासदार उज्वल निकम यांचा नाव न घेता एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांना टोला लगावला.
हनी ट्रॅप व प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोन्हीही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मात्र मी कोणालाही लिमिट क्रॉस करू देत नाही कारण डिलीट क्रॉस केली की मग आरोप प्रत्यारोप होतात असं देखील उज्ज्वल निकम म्हणाले. उज्वल निकम हे आता खासदार झाले असून एकत्र येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, असा पलटवार महाजन यांनी केला.
Ujjwal Nikam: वकील ते खासदार! उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड नेमकी का झाली? 'ही' आहेत कारणं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world