Jalgaon News : आज नेटची पुनर्परीक्षा होत आहे. नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. अनेकांकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान आज २१ जून रोजी विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा पार पडली. अशावेळी पुनर्परीक्षा विद्यार्थ्यांची की, पालकांची असा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळी झालेल्या परीक्षेत पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांसह पालकही तणावाखाली आहेत.
त्यामुळे आपल्या पाल्याच्या पुनर्परीक्षेसाठी पालकही परीक्षा सुरू असताना केंद्राबाहेरच तळ ठोकून थांबून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेसह पालकांच्याही संयमाची परीक्षा पाहायला मिळत असून गेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे तणावात असलेल्या पालकांनी लोकप्रतिनिधी शासन प्रशासनासह व्यवस्थित विरोधातही तीव्र रोष व्यक्त केला आहे.
वाशिममध्ये कडेकोट बंदोबस्तात १० केंद्रांवर NEET परीक्षा सुरू...
नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चर्चेत आलेल्या नीट परीक्षेला आज दुपारी २ वाजता सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची बायोमेट्रिक पडताळणी, ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा तपासणी करण्यात आली. तपासणीनंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओग्राफीद्वारे संपूर्ण परीक्षेवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. प्रश्नपत्रिका अत्यंत गुप्त पद्धतीने केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रावर दुपारी १.४५ नंतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून परीक्षा शांततेत आणि सुरळीत वातावरणात सुरू आहे.