Farmer News: CCI केंद्रांवर शेतकऱ्यांचे हाल, कापूस कुठे अन् कसा विकायचा? बळीराजासमोर मोठं संकट

सीसीआय केंद्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून त्यामुळे  जिल्हाधिकाऱ्यांना सीसीआय केंद्र वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात सीसीआयच्या केंद्रांवर अनेक अटी व शर्तीच्या नावाखाली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून आधीच अतिवृष्टी, रोगराई अशा कारणांमुळे कापसाचं उत्पन्न घटले आहे. दुसरीकडे निर्यात ठप्प असल्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे.

त्यातही सीसीआय केंद्राच्या माध्यमातून विविध अटी शर्ती लावून अडवणूक केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान सीसीआय केंद्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सीसीआय केंद्र वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कापूसामध्ये असलेल्या आद्रतेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना मात्र अटी व शर्तीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कमीत कमी आद्रतेचा कापूस सीसीआय केंद्रावर विक्रीसाठी कसा आणता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त सीसीआय केंद्र उभारल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे.

Advertisement

सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणेच खाजगी बाजारभावापेक्षा सीसीआय केंद्रावर अधिकचा भाव दिला जात असल्याचेही रक्षा खडसे यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या दर्जाचा कापूस हा अपेक्षित आहे त्या दर्जाचा कापूस हा सीसीआय केंद्रावर देणे आवश्यक असून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सीसीआय केंद्रावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही रक्षा खडसे म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...

दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्रदूषणात मोठी गट झाली असून अवकाळी पावसाने वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात घसरण झाल्याने प्रदूषणातही घट झाली आहे. अवकाळी पावसापूर्वी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 157 वर पोहोचला होता मात्र जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेचा निर्देशांक हा 65 पर्यंत खाली आला आहे त्यामुळे प्रदूषणापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.