Jalna Accident : जालन्यात टॅक्सी विहिरीत कोसळली; 5 प्रवाशांचा मृत्यू

Jalna Accident : प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना-राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची ही घटना घडली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

जालन्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना-राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची ही घटना घडली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालना -राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची वसंतनगर तांडा या ठिकाणी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे.  पाण्यात बुडून 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सहा ते सात जण अजूनही विहिरीत असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवली जात आहे.

Jalna Accident

(नक्की वाचा- उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रेल्वे रुळावरुन घसरली; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

मृतांमध्ये बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. जालन्याहून राजूरकडे प्रवासी घेऊन जाणारी ही काळी पिवळी टॅक्सी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने राजूर-जालना महामार्ग शेजारी असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. टॅक्सीमध्ये 13 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांनी विहिरीत कोसळलेली काळी-पिवळी टॅक्सी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सहा जणांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले आहे. बचाव कार्य सुरु असून विहिरीत आणखी 6 ते 7 जण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी राजूर पोलिसांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने  शोध सुरु आहे.

Advertisement

Topics mentioned in this article