जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी थेट गांजा शेतीचा व्यवसाय उघडकीस आणल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल 10 लाख 64 हजार 800 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे एका छोट्याशा गुन्हाचा शोध घेत असताना एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.
जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चार महिलांसह तीन आरोपींनी हल्ला केला होता. दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न तीन दिवसापूर्वी केला अंबड तालुक्यातील गोंदी तांडा या ठिकाणी केला होता. यात गोंदी पोलिसांनी आरोपींना अटक करत चौकशी केली असता आरोपी गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचं समोर आलं आहे. आरोपींजवळील असलेला गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यानंतर गोंदी पोलिसांनी आज त्यांच्या घराची झाडा झडती घेतली असता पोलिसांना घरामागील जागेत गांजाची झाडं लावल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गांज्याची झाडं नष्ट करत 3 लाख 64 हजार 800 रुपयांचा 14 किल्लो गांजा जप्त केला. गांजा विक्रीसाठी वापर करण्यात येणाऱ्या 7 लाखांची स्कार्पिओ कार, दोन दुचाकी असा एकूण 10 लाख 64 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नक्की वाचा - Sangli Crime : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईनेही स्वत:ला संपवलं; सांगलीतील धक्कादायक प्रकार
यात आरोपी गंगाराम सावळा पवार, वकिल्या ऊर्फं विलास बाबराव शिंदे प्रभाकर गंगाराम पवार,याच्या सह पाच महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध राज्यात आणि परराज्यात विविध पोलीस ठाण्यात चोरी, पाकीटमारी, घरफोडीचे व 'दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांच्या पथकांकडून अधिक तपास केला जात आहे.