
सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एका तरुणाचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या संशयित तरुणाने हा खून केला, त्याच्या आईने मुलाच्या कृत्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण आणि दादागिरीतून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाचा संशयित स्वप्निल क्षीरसागर व सुशांत शेजुळ यांनी डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार घडला आहे. खुनाची बातमी गावात पसरली आणि एकच खळबळ उडाली. संशयित तरुण असणाऱ्या सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना देखील खुनाची बातमी समजली.
नक्की वाचा - Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
आपल्या मुलाने खून केल्याचा विमल शेजुळ यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास कवठेमंकाळ पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world