जमशेदजी टाटांच्या निश्चयामुळे देशाला मिळालं पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल!

ताज हॉटेल उभारणीसाठी 4 कोटी 21 लाखांचा खर्च झाला होता. त्यावेळी हे भारतातील एकमेव हॉटेल होते, जिथं विजेची व्यवस्था होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

देशात भव्य हॉटेलांची कमतरता नाही. मात्र कोणत्याही शहरात राहायचं असेल तर पहिली पसंती फाइव्ह स्टार हॉटेलांना दिली जाते. मात्र तुम्हाला देशातील पहिल्या फाइव्ह स्टार हॉटेलबद्दल माहिती आहे का? 

मुंबईतील 'ताज' हे देशातील पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ताज हॉटेल बांधण्यासाठी 14 वर्षे लागली आणि शेवटी 1903 मध्ये ते लोकांसाठी खुले करण्यात आले. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असलेलं हे हॉटेल मुंबईतील पर्यटन स्थळही मानलं जातं. मुंबईत येणाऱ्या लोकांचं पर्यटन ताज हॉटेल पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही.

Advertisement

या हॉटेल उभारणीची कहाणीही खूप रंजक आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बॉम्बेत काला घोडा परिसरात वॉटसन्स नावाचं एक प्रसिद्ध हॉटेल होतं. त्यावेळी इंग्रजांनी देशात वर्णभेद केला जात होता. या हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश करण्यास मनाई होती. एकदा जमशेदजी या हॉटेलमध्ये जात असताना यांना थांबवण्यात आले. युरोपियन नसल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असं सांगण्यात आलं. या गोष्टीने त्यांना धक्काच बसला. 

Advertisement

1903 मध्ये हॉटेलची उभारणी...

त्यावेळी युरोप आणि पाश्चात्य देशांच्या हॉटेलांशी स्पर्धा करू शकेल असं हॉटेल मुंबईत नव्हतं. परदेशातील हॉटेलांशी स्पर्धा करू शकेल, असे हॉटेल भारतातही बांधले जावं यासाठी जमशेदजींनी प्रयत्न सुरू केले. एक असं हॉटेल, जे सर्वांसाठी खुले असेल. तिथे फक्त भारतीयच नाही तर परदेशी लोकही आरामात बसून खाऊ-पिऊ शकतील. हॉटेलचं नाव आग्र्यातील ताजमहल या नावावर ठेवण्यात आलं. दोन वेगवेगळ्या इमारतीत हॉटेल उभारण्याचा प्लान करण्यात आला. एक ताजमहल पॅलेस आणि दुसरा टॉवर. ताजमहल पॅलेस २० व्या शतकाच्या सुरुवातील तयार करण्यात आलं होतं. तर टॉवर १९७३ मध्ये सुरू करण्यात आलं. 

Advertisement

किती खर्च...

ताज हॉटेल उभारणीसाठी 4 कोटी 21 लाखांचा खर्च झाला होता. त्यावेळी हे भारतातील एकमेव हॉटेल होते, जिथं विजेची व्यवस्था होती. देशातील पहिलं असं हॉटेल जिथं हार्बर बार आणि दिवसभर सुरू राहिल अशा रेस्टॉरंटचा परवाना मिळाला होता. 1972 मध्ये देशातील पहिल्यांदा 24 तास खुले राहणारे कॉफी शॉप येथीलच होतं. ताज महल पॅलेज देशातील पहिलं एसी रेस्टॉरंट आहे. त्यावेळी येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील डिस्कोथेकदेखील होतं. 

एका रूमसाठी किती भाडं?
हॉटेलची सुरुवात झाली तेव्हा एका सिंगल रूमचे एका दिवसाचे भाडे 10 रुपये होते. पंखा आणि बाथरूम असलेल्या रूमचे भाडे 13 रुपये होते. 

वेगवेगळ्या देशांमधून आलं सामान...

जमशेदजींनी हॉटेल उभारण्याच्या घोषणेसह इतर तयारीही सुरू केली होती. यासाठी लागणारं सामान त्यांनी स्वत: वेगवेगळ्या देशातून आणलं होतं. लंडन ते बर्लिनपर्यतच्या बाजारांमध्ये जाऊन सामानाचा शोध घेण्यात आला. लिफ्ट जर्मनीमधून मागवण्यात आली, तर पंखे अमेरिकेतून. बॉल रूममधील खांब पॅरीस, बाथरूममधील बाथटब तुर्कीमधून आणण्यात आले. रूम थंड ठेवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड बर्फ निर्माण संयंत्र लावण्यात आलं होतं. ताज हॉटेल भारतातील असं एक हॉटेल होतं, ज्यामध्ये रूम थंड ठेवण्यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली होती आणि या खोल्यांमध्ये विजेचीही सुविधा होती. 

Topics mentioned in this article