Jawhar Nagar Parishad Election Result: बायको नगराध्यक्ष तर नवरा नगरसेवक, जव्हारमध्ये भाजपची विक्रमी कामगिरी

Jawhar Nagar Parishad Election Result: भाजपचे तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत हे अवघ्या 24 मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांनी शिवसेना (उबाठा) चे महेश करमरकर यांचा पराभव केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jawhar Nagar Parishad Election Result: शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मा रजपूत या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या
Hemant Savara FB post
जव्हार:

Jawhar Nagar Parishad Election Result: जव्हार नगर परिषदेच्या राजकारणात यंदा ऐतिहासिक उलथापालथ झाली असून, स्थापनेपासून काँग्रेस–राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचे वर्चस्व असलेल्या जव्हारमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रथमच पूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे.  एकूण 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 14 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. शिवसेनेला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. शहरात प्रभाव असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले, तर मागील सत्ताधारी शिवसेना (उबाठा) गटाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.  

नक्की वाचा: 'भाजपने 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला', राज्यात किती नगरसेवक? CM फडणवीसांनी सांगितलं

पूजा उदावंत जव्हारच्या नगराध्यक्ष

जव्हारच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 1653 मतांनी पराभव केला. पूजा उदावंत यांना 3865 मते मिळाली, राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या रश्मी मणियार यांना 2212 मते मिळाली तर शिवसेनेच्या पद्मा रजपूत यांना 1749 मते मिळाली.

पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक

या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जव्हारच्या नगराध्यक्ष पूजा उदावंत या कुणाल यांच्या पत्नी आहेत.  कुणाल उदावंत यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना (उबाठा) चे महेश करमरकर यांचा पराभव केला. अवघ्या 24 मतांच्या फरकाने कुणाल उदावंत विजयी झाले आहेत. कुणाल आणि पूजा उदावंत विजयी झाल्याने जव्हार नगर परिषदेत पत्नी नगराध्यक्ष आणि पती नगरसेवक असे दुर्मिळ चित्र पहायला मिळणार आहे.

नक्की वाचा: मतदारराजाची संघर्षाला साथ! फळ विकून पोट भरणाऱ्या ताई नगरसेविका झाल्या

एकीकडे हरल्या, दुसरीकडे जिंकल्या

शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मा रजपूत या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या, तरी प्रभाग क्रमांक 1 मधून नगरसेवक म्हणून त्या विजयी झाल्या आहेत.जव्हार नगर परिषदेच्या या निकालाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून, भाजपने या निवडणुकीत विक्रमी कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article