CM Devendra Fadnavis Speech: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट घेतली. रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत भाजपने या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड मोडल्याचे सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे मनापासून अभिनंदन. आपण सर्वांनी या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवला. २७ पैकी २२ नगरपरिषद आपण जिंकलो. अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल आपल्याला मिळाला. सर्व मतदार बंधु भगिनींचे मनापासून आभार. कालच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Maharashtra Elections: मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमधून 'मविआ' हद्दपार! महायुतीचा महाविजय
तसेच "राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. आपले ६५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले हा रेकॉर्ड आहे. २०१७ मध्ये १५०० नगरसेवक निवडून आले यावेळी ३००० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आलेत. गेल्या ३० वर्षात एवढे नगरसेवक कुणाचे निवडून आलेले नाहीत. राज्यभरात महाराष्ट्रात एकट्या भाजपचे ४८ टक्के नगरसेवक निवडून आलेत. महाराष्ट्रातल्या मतदारांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवला आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. "नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक विरोधकांचे किल्ले पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. सर्व ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने निवडून आले आहेत. सर्व बड्या नेत्याच्या बालेकिल्ल्यांना उद्ध्वस्त केले आहेत. १८ ते १९ नगरपालिकांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत असूनही काही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येऊ शकले नाहीत. विजयाचा रथ सुरू राहील आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा रथ घोडदौड करेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Sidhi vastre News: शिंदेंच्या रणरागिणीची कमाल! अवघ्या 22 वर्षी नगराध्यक्षा; कोण आहे सिद्धी वस्त्रे?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world