जाहिरात

Sangli News: 'आता नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार...' जयंत पाटील हे काय बोलले?

मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरुनच माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले.

Sangli News: 'आता नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार...' जयंत पाटील हे काय बोलले?

 सांगली: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. आधी अजित पवार गट आणि आता काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. या बातम्यांवरुन आता स्वतः जयंत पाटील यांनी माध्यमांची फिरकी घेतली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत मोठे विधान केले आहे. 

 राजाराम बापु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कार्यक्रमा निमित्ताने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरुनच माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले जयंत पाटील?

'नितिन गडकरी साहेब इथे आले आणि त्यांनी फार चांगले प्रतिसाद देऊन आमच्या या इन्स्टिट्यूटला भेट दिली. आता नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान तयार करू नका, कशाची बातमी कराल हे याबाबत मी पत्रकारांवर रागावणार नाही. पत्रकारांनी एक बातमी सोडली आणि त्याच्यावर मोठमोठे लोक चिंतन करायला लागले आहेत. पण दोन पक्षांची माणसं एकाच वेळेस व्यासपीठावर येऊ शकत नाही, अशी धारणा पत्रकारांची झाली आहे,असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटलांच्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही समाचार घेत, जयंतराव तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका आणि मला काही फरक पडला नाही. कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायचं नाही. शेवटी राजकारण असे आहे, माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्या बरोबर आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले जोपर्यंत तुम्ही निवडून येत नाही ,तोपर्यंत तुम्ही पक्षाचे आहात,आमदार झाल्यावर तुम्ही जनतेचे आणि देशाचे आहात, असे नितीन गडकरी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

तसेच महाराष्ट्रात इलेक्शन पुरते राजकारण राहिले, निवडणूकीनंतर नंतर राजकारण झालं नाही, पंधरा दिवसात ज्यांच्यात दम असेल त्यांनी दम मारून घ्ययचा असतो.  आजचा कार्यक्रम हा राजकारणाचा नाही,तर जयंत पाटील माझे उत्तम मित्र आहेत म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. वैचारिक मतभेद निवडणूकीत असेल पण मनभेद नसेल पाहिजेत, असं ही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.