जाहिरात

Jejuri Accident : जेजुरीजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

Jejuri Accident News : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ मोठा अपघात झाला आहे.

Jejuri Accident : जेजुरीजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
जेजुरी, पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Jejuri Accident News : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ मोठा अपघात झाला आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकप टेम्पोचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर बुधवारी रात्री (18 जून) सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेल मध्ये पीकअप टेम्पो मधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरला जाणाऱ्या कारने पिकप टेम्पोला जोरदार धडक दिली.
   
या अपघातात टेम्पोतून साहित्य खाली उतरवणारे आणि कारमधील आठ जण जागीच ठार झाले. तर दोन मुले,एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले झाल्याची माहिती  आहे. या अपघातानंतर जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

( नक्की वाचा : Ghatkopar station : घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला )

मृत व्यक्तीची नावं

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये सोमनाथ रामचंद्र वायसे,रामू संजीवन यादव यांचा मृत्यू झालाय. हे दोघेही पुरंदर तालुक्यातील नाझरे कप या गावचे आहेत. तर अजय कुमार चव्हाण हा मृत व्यक्ती उत्तर प्रदेशातील आहे.

अजित अशोक जाधव हा भोर तालुक्यातील कांजळे येथील असून किरण भारत राऊत हा इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील आहे. यासोबतच आश्विनी संतोष ऐसार नागणसूर हेंद्रे सोलापूर, अक्षय शंकर राऊत बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील रहिवाशी आहे. अन्य एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामधील जखमींना जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com