जाहिरात

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत महायुती सुसाट! मतदानाआधीच इतक्या जागा बिनविरोध; विरोधकांना धक्का

शिवसेना आणि भाजपकडून बंडखोरांना शमविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजप शिव सेनेला किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत महायुती सुसाट! मतदानाआधीच इतक्या जागा बिनविरोध; विरोधकांना धक्का

Kalyan Dombivali Election 2026:  राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे मुंबई, पुणे ठाण्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये महायुद्ध सुरु असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचा धडाका लावला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत भाजपचे ८ आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार निवडून आले आहेत.

कल्याण डोंबिवलीत महायुती सुसाट..

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत आत्तापर्यंत भाजपचे ८ आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे डाेंबिवलीचे शहराध्यक्ष व प्रभाग क्रमांक २७ ड मधून मनसे उमेदवार मनोज घरत यांनी माघार घेतल्याने भाजपचे महेश पाटील हे बिनविरोध निवडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Thane Election: ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा 'धडाका'! मतदानाआधीच 4 उमेदवार बिनविरोध; वाचा यादी

कल्याण डोंबिवली एकूण 122 प्रभाग आहे. प्रचार आणि मतदान होण्यापूर्वीच १२ जागांवर युतीचा झेंडा फडकला आहे. विरोध पक्ष न लढताच मैदान सोडून पळाला आहे. आत्तापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदारामध्ये भाजपच्या  रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील, ज्योती पाटील, महेश पाटील, मुकुंद पेडणेकर, साई शेलार यांचा समावेश आहे. 

12 उमेदवार विरोध...

तर शिवसेना शिंदे गटाकडून रमेश म्हात्रे, हर्षल मोरे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांचा समावेश आहे. उबाठा आणि मनसेच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघार घेतली आहे. महापौर बसविण्याचा दावा करणारा विरोधी पक्ष मतदाना आधीच मैदान सोडून पळाला आहे अशी चर्चा नागरीक आणि मतदारांमध्ये आहे. १२२ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या आहे. उर्वरीत ११० जागेकरीता मतदान होणार आहे.

(नक्की वाचा-  TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)

यामध्ये काही जागांमध्ये बंडखोरी झाली आहे. शिवसेना आणि भाजपकडून बंडखोरांना शमविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजप शिव सेनेला किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com