आज कार्तिकी एकादशीचा उत्साह...,पंढरपुरात पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आज कार्तिकी एकादशीचा सोहळा...यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांचा उत्साह मोठा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकरी आणि भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. हरी नामाचा जयघोष... मुखी विठ्ठल विठ्ठल नाम... म्हणून लाखो वारकरी भक्तजन चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी करताना दिसतात. एकादशी दिवशी पवित्र चंद्रभागेच्या स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन म्हणजे वारकऱ्यांसाठी सुवर्णकांचन योग.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अशातच कार्तिकी एकादशी दिवशी चातुर्मास समाप्ती असते. त्यामुळेही मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात. कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात पाच लाख भाविक दाखल झाले असून कार्तिकीच्या निमित्ताने चातुर्मासाची समाप्ती झाली आहे. विठ्ठलाच्या महापूजेने कार्तिकीच्या सोहळ्याची सुरुवात झाली असून कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांऐवजी पुणे विभाग आयुक्तांनी शासकीय महापूजा केली आणि निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी विठुरायाला साकडं घातलं. 

Advertisement

नक्की वाचा - यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त  

आज कार्तिकी एकादशीचा सोहळा...यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांचा उत्साह मोठा आहे.  अशातच पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि लातूर जिल्ह्यातील बाबुराव सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्यांकडून करण्यात आली. आचार संहिता असल्याने उपमुख्यमंत्री यांच्या ऐवजी पुणे विभागीय आयुक्त यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मंदिरे समितीच्या वतीने आचासंहितेचे पालन करून शासकीय महापुजेचा सोहळा झाला. या शासकीय महापूजेनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. आज एकादशी निमित्त  मंदिरात पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. या निमित्ताने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्यातील जनता सुखकर राहो आणि निवडणुका शांततेत पार पडो... असे साकडे विठुराया चरणी घातले. 

Advertisement