राकेश गुडेकर, प्रतिनिधी
मुंबई - गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कशेडी बोगदा (Kashedi tunnel) आजपासून पुढील 15 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
नक्की वाचा - VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला
मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचं काम सुरू आहे. हे काम करताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे बोगद्यातून होणारी वाहतूक सध्या 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
येणारी-जाणारी दोन्हीकडील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. बोगद्यामुळे येथील प्रवासाची 45 मिनिटं वाचली जात होती. मात्र पुन्हा घाटमार्गे प्रवास करावा लागल्याने प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन्ही मार्गावरील वाहतूक येथून बंद असल्याने घाटमार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.