विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कराड येथील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार आणि रोहित पवार यांनी भेटीनंतर एकमेकांचं निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केलं. यावेळी अजित पवार यांनी मिश्किलपणे रोहित पवारांना म्हटलं, "बच गया. दर्शन घे दर्शन, काकाचं दर्शन घे. थोडक्यात वाचलास. माझी एखादी सभा झाली असती तर काय झालं असतं? बेस्ट ऑफ लक", असा मिश्किल टोला अजित पवार यांनी रोहित पवारांनी लगावला.
रोहित पवार यांनी या भेटीवर म्हटलं की, माझे ते काका आहेत त्यामुले मी त्यांच्या पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता अजूनही आहे. माझ्या 2019 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मला खूप मदत केली होता. पाया पडणे माझी जबाबदारी होती. आम्ही संस्कृती पाळलो.
(नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक)
रोहित पवारांनी म्हटलं...
अजित पवारांची सभा झाली असती तर नक्कीच निकाल वरखाली झाला असता. मात्र ते बारामतीत अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं. तर अजित पवार यांनी म्हटलं की, "शरद पवार भेटले असते तर मीही दर्शन घेतलं असतं. तसंच रोहित पवारांनी दर्शन घेतलं. आपली ही संस्कृती आहे."
(नक्की वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड)
रोहित पवारांचा अटीतटीच्या लढतीत विजय
रोहित पवार यांचा यंदात विजय सोपा नव्हता. अत्यंत अटीतटीच्या लढतीत रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांना आपला विजय साजरा केला. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मते मिळाली. तर भाजपचे राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world