जाहिरात

Khambatki Tunnel: खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीला ब्रेक! धोकादायक वळणांतून सुटका, वाहनचालकांना दिलासा

बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीला ब्रेक बसणार आहे. येत्या ९ मेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. 

Khambatki Tunnel: खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीला ब्रेक! धोकादायक वळणांतून सुटका, वाहनचालकांना दिलासा

राहुल तपासे, सातारा:

 Pune Bengaluru Expressway:  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. पुणे बंगळुरु महामार्गावरील  खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीला ब्रेक बसणार आहे. येत्या ९ मेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. 

Weather Update: सावधान! राज्यात उष्णतेच्या लाटेसोबत पावसाचा कहर, 13 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा आता चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे…या नवीन सहापदरी बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील धोकादायक वळणं, सतत होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांपासून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. विशेष म्हणजे या बोगद्यामुळे पुणे-सातारा मार्गावरील प्रवासाचा तब्बल अर्धा तास वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे.

 या नव्या बोगद्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चाकरमान्यांसह हजारो प्रवाशांसाठी आता वाहतूक अधिक सुखकर होणार आहे.  एनएचएआयकडून हा बोगदा सध्या चाचणीसाठी खुला करण्यात आला असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ मे रोजी या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. 

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com