Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. राज्यावर सध्या उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचे सावट असून, हवामान विभागाने ७ मे रोजी राज्यातील १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर असतानाच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune News: भाविकांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून भीमाशंकर मंदिर पुन्हा सुरु होणार
महाराष्ट्रात उन- सावलीचा खेळ
समोर आलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर सध्या प्रचंड आर्द्रता वाढल्याने मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. रायगड ते सिंधुदुर्गपर्यंतच्या पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, पुढील ७२ तास हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोकणात उकाड्यासोबतच पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळ्यात उष्णतेचा कहर सुरूच असून तिथे पारा ४४ अंशांच्या पार जाण्याची भीती आहे. मराठवाड्यातही बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world