जाहिरात

Sindhudurg Crime : खलाशाची हत्या करून बोट पेटवली, खोल समुद्रातील थरार

Sindhudurg Crime : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून बोटीवरील तांडेलचा खून केला. देवगड जवळील कुणकेश्वरपासून खोल समुद्रात 15 वाव अंतरात दुपारी ही घटना घडली. 

Sindhudurg Crime : खलाशाची हत्या करून बोट पेटवली, खोल समुद्रातील थरार

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग

खोल समुद्रात खलाशांमध्ये झालेल्या वादानंतर बोटीवरील तांडेलची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने त्यानंतर बोट देखील पेटवून दिली. सिंधुदुर्गच्या देवगड समुद्रात ही घटना घडली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून बोटीवरील तांडेलचा खून केला. देवगड जवळील कुणकेश्वरपासून खोल समुद्रात 15 वाव अंतरात दुपारी ही घटना घडली. 

(नक्की वाचा-  मोबाईल चोरीच्या संशयावरुन तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना तीन तासात बेड्या)

यामध्ये बोटीचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा हा बोटीवरून तांडेलाचा खून करून उडी मारून पलायन करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तर रविंद्र नाटेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

(नक्की वाचा-  YouTuber Couple Dead : यूट्युबर जोडप्याच्या अचानक मृत्यूने खळबळ, काही तासांपूर्वीच अपलोड केलेला VIDEO)

रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया मिरकर वाडा येथून बोट मासेमारीसाठी निघाली होती. कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी आणि तांडेल यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांने तांडेल रवींद्र नाटेकर यांचा खून केला आणि बोट पेटवून दिली. घटनास्थळी देवगड पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. अधिक तपास पोलील करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com