जाहिरात

Kolhapur Accident: उद्योजकाचा मुलगा, वेगाने घात केला! 12 लाखांची बाईक अन् 70 हजारांच्या हेल्मेटचे तुकडे

Kolhapur Accident News: सिद्धेश विलास रेडेकर याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील 70 हजारांच्या हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले.

Kolhapur Accident: उद्योजकाचा मुलगा, वेगाने घात केला! 12 लाखांची बाईक अन् 70 हजारांच्या हेल्मेटचे तुकडे

विशाल पुजारी, कोल्हापूर: तब्बल 12 लाखांची बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट घातलेल्या कोल्हापूरमधील उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. आजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन ही मोठी दुर्घटना घडली. सिद्धेश विलास रेडेकर असे या मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार,  बाईक रायडींगसाठी गेलेल्या कोल्हापूरमधील उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आंबोलीहून परत येताना देवर्डे माद्याळदरम्यानच्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला. ज्यामध्ये सिद्धेश विलास रेडेकर याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील 70 हजारांच्या हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले.

सिद्धेश हा कोल्हापूरमध्येच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याला बाईक रायडिंगचे वेड होते. नेहमीप्रमाणे तो आंबोलीला रायडींगसाठी गेला होता.  तिथून माघारी येत असताना आजरा ते आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आंबोलीहून परत येताना देवर्डे माद्याळदरम्यानच्या धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.

ट्रेंडिंग बातमी -  Cidco News: सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?

गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सिद्धेशचा मृत्यू झाला. तब्बल 12 लाखांची गाडी आणि डोक्यावर घातलेले 70 हजारांचे हेल्मेटही तरुणाचा जीव वाचवू शकले नाही. या घटनेने मृत मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघातातील चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Sharad pawar: शरद पवारांसाठी नेत्याची भन्नाट सेटींग, लग्नाला यावं म्हणून काय केलं एकदा पाहाच

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: