साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून ज्या देवीची ओळख आहे ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. या अंबाबाईचे भक्तगण संपूर्ण जगभरात आहेत. कधी ना कधी हे भक्त दर्शनासाठी इथं येत असतात. त्यावेळी काही ना काही दान आपल्यापरीनं ते करत असतात. तर काही भक्त हे त्यांनी दिलेल्या दानामुळे चर्चेत येतात. असच एक दान अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आलं आहे. त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. अंबाबाईच्या चरणी एका भक्तानं तब्बल 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी एका भाविकानं तब्बल 71 तोळ्यांचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे. या सिंहाची किंमत तब्बल 50 लाख 33 हजार इतकी आहे. देवीच्या मूर्तीजवळ पूजेसाठी हा सिंह ठेवण्यात आलेला होता. देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा सिंह सुपूर्द करण्यात आलाय. भाविकाच्या इच्छेनुसार त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आल आहे. मात्र या सिंहाची चर्चा मात्र कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे.
ही सिंह 71 तोळे 100 ग्रॅम वजनाचा आहे. हा सोनं आणि काही प्रमाणात चांदीनं घडवण्यात आला आहे. ज्या भाविकानं हा सिंह दिला आहे त्याने आपलं नाव गुप्त ठेवावे अशी विनंती देवस्थान समितीच्या अध्यक्षाकडे केली होती. त्यानुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. ज्या वेळी हा सिंह दान करण्यात आला त्यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्यासह सचिव शिवराज नायकवडी, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे हे ही उपस्थित होते. या सोन्याच्या सिंहाचे फोटो सोशल सध्या मीडियावर जोरदार व्हायर झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात त्याची जोरदार चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world