जाहिरात

Brave boy News: चिमुकला पहिल्या माळ्यावरून पडला, धाडकन आपटला, तरी ही ओ नाही की टो नाही...

तिथे उपस्थित असलेली व्यक्ती त्यावेळी श्रीवंशच्या दिशेने धावली. त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. पण तो खाली आदळला.

Brave boy News: चिमुकला पहिल्या माळ्यावरून पडला, धाडकन आपटला, तरी ही ओ नाही की टो नाही...
  • सव्वा वर्षाचा मुलगा श्रीवंश गॅलरीतून पडला
  • कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावातील घटना
  • सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली असून मुलाला हात आणि डोक्यावर किरकोळ जखम
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

'देवतारी त्याला कोण मारी' या म्हणीचा जणू प्रत्येयच लव्हटे कुटुंबाने घेतला. वेळ आला होता पण काळ आला नव्हता असंच काहीसं या कुटुंबा सोबत घडलं. हे कुटुंब पुन्हाळा तालुक्यातल्या कोतोली या गावात राहातं. त्यांच घर या गावात आहे. हे घर दुमजली आहे. लव्हटे कुटुंबात सव्वा वर्षाचा चिमुकला आहे. त्याचं नाव श्रीवंश आहे. तो घरात खेळता खेळता गॅलरीत गेला. पण त्याच वेळी त्याचा तोल कसा गेला हे त्याला ही समजलं नाही. तो धाडकप पहिल्या माळ्यावरू खाली रस्त्यावर आदळला त्यानंतर एकच धावाधाव झाली. ही सर्व घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली. 

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात एक आश्चर्यचकीत करणारी ही घटना घडली आहे. गावातील लव्हटे कुटुंबावर काळ आला होता, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं.  सव्वा वर्षाचा श्रीवंश हा चिमुकला एका अपघातात सुरक्षितपणे बचावला आहे. गॅलरीत खेळत असताना तो अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर सर्वांची धावाधाव झाली. तो ज्या ठिकाणावरून पडला ते रस्त्यापासून फार उंचावर होते. त्यामुळे श्रीवंशच्या घरच्यांचा त्यावेळी काळजाचा ठोकाच चुकला. आरडो ओरडा अन् पळापळ झाली. 

नक्की वाचा - Kolhapur News: गर्भलिंग निदान चाचणी रॅकेटचा पर्दाफाश! डॉक्टर फरार, कारवाईत धक्कादायक साहित्य जप्त

तिथे उपस्थित असलेली व्यक्ती त्यावेळी श्रीवंशच्या दिशेने धावली. त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. पण तो खाली आदळला. सीसीटीव्हीमध्ये तसं स्पष्ट पणे दिसत आहे. तो खाली आदळल्यानंतर त्याला उचलण्यात आलं. त्याला लागलं आहे की नाही ते पाहीलं गेलं. त्यावेळी त्याच्या केवळ हातावर आणि डोक्याला किरकोळ मार लागला होता. जीवावर आले ते किरकोळ जखमेवर निभावले आणि मोठा अपघात टळला, त्यामुळे श्रीवंशच्या आई वडीलांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांच्या तर काळजाचा ठोकाच चुकला होता. पण देवाची कृपा म्हणून मोठा अनर्थ टळला. 

नक्की वाचा - CIDCO News: सिडको घरांच्या किंमती जाहीर, पण ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना येतोय मेजर प्रॉब्लेम

यानंतर श्रीवंशला तातडीने रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं. तिथे त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तपासणीनंतर त्याला घरी आणण्यात आले. या घटनेची चर्चा संपूर्ण गावात चांगलीच रंगली होती. कुटुंबीय, ग्रामस्थ आणि नातेवाईक साऱ्यांनी या चमत्कारिक घटनेसाठी देवाचे आभार मानले आहेत. शिवाय हे कसं घडलं हे ही रंगवून सांगितलं जात होतं. पण लहान मुलांची काळजी घेतली पाहीजे. त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहीजे. घरांना ग्रिल नसतील तर ते लावले पाहीजे. नाही तर असे अपघात होत राहतील अशी ही भीती व्यक्त केली जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com